PMAY 2.0 Scheme : पीएम आवास योजना सुरू, नवीन घरासाठी तयार ठेवा ही कागदपत्रं, असा करा अर्ज

| Updated on: Dec 22, 2024 | 11:03 AM

PMAY 2.0 Scheme : पंतप्रधान पीएम आवास योजना 2.0 पुन्हा सुरू झाली आहे. नवीन घरासाठी आता नागरिकांना अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी अर्जदाराला ही कागदपत्रं द्यावी लागतील. तर अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

PMAY 2.0 Scheme : पीएम आवास योजना सुरू, नवीन घरासाठी तयार ठेवा ही कागदपत्रं, असा करा अर्ज
पीएम आवास योजना सुरू
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी पीएम आवास योजना (PMAY 2.0 Scheme) सुरू केली आहे. या योजनेतंर्गत पुढील पाच वर्षांत एक कोटी कुटुंबांना फायदा देण्यात येणार आहे. किफायतशीर दरात घर तयार करणे, खरेदी करणे आणि भाड्याने घेण्यासाठी मदत करणे यासाठी ही योजना मदत करेल. यासाठी अर्जदाराला ही कागदपत्रं द्यावी लागतील. तर अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

चार श्रेणीत मिळेल योजनेचा लाभ

केंद्राच्या PMAY 2.0 अंतर्गत 2.30 लाख कोटी वाटप करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरांना मंजूरी देण्यात आली होती. तर 85.5 लाखांहून अधिक घरं अगोदरच पात्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात चार उत्पन्न घटकांतील पात्र लाभार्थ्यांना योजनेतंर्गत लाभ देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

BLC : यातंर्गत सरकार 45 चौरस मीटरपर्यंत घर तयार करण्यासाठी आर्थिक मदत देईल. केंद्र सरकार घर तयार करण्यासाठी 2.25 लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल. तर राज्य सरकार किती रक्कम देईल हे स्पष्ट झाले नाही. यासाठी पात्र व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत हवे.

AHP : यानुसार, खासगी, सरकारी स्तरावर नवीन हाऊसिंग योजनेतंर्गत घर तयार करण्यात येईल. आर्थिक दुर्बल घटकांना EWS घटकांना घर देण्यात येईल. यामध्ये केंद्र सरकार 2.25 लाख आणि राज्य सरकार 50 हजार मदत देईल. यासाठी वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये हवे. तर LIG कुटुंबियांसाठी उत्पन्नाची अट ही तीन लाख ते सहा लाख रुपया दरम्यान आहे.

ARH : यातंर्गत भाडेतत्वावर देण्यासाठी गृहप्रकल्प तयार करण्यात येतील. ज्यांच्याकडे घर तयार करण्यासाठी अथवा खरेदीसाठी पैसे नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना आहे.

ISS (interest Rate Subsidy) : यामध्ये घराची किंमत 35 लाख रुपयांपर्यंत असेल तर 25 लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाची विशेष सुविधा देण्यात येईल. 120 चौरस मीटर वा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे घर खरेदी करणाऱ्यांना 1.80 लाख रुपयांपर्यंत कर्ज सबसिडी देण्यात येईल. याचा लाभ EWS/LIG आणि MIG यांना मिळेल.

असा करा अर्ज

या योजनेतंर्गत अर्ज करण्यासाठी www.https://pmay-urban.gov.in या संकेतस्थळावर जा. PMAY-U 2.0 साठी निवेदन करण्यासाठी क्लिक करा. तुमचे वार्षिक उत्पन्न, पत्ता आणि इतर कागदपत्रे जमा करा. OTP सह आधार सत्यपित करा.