Streedhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील निवडणूक सभेतील एका वाक्यावरुन देशभरात रान पेटले आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस, देशातील माय-बहिणींचे मंगळसूत्र ठेवणार नाही, अशी टीका केली होती. ते या मंगळसूत्राची किंमत किती, याचा हिशोब करतील, असे ते म्हणाले. पण तुम्हाला माहिती आहे का, स्त्री-धन काय असते? महिलांचे अधिकार काय? अविवाहित महिलांना कायद्याने संपत्तीत किती अधिकार मिळतो? राजकीय बँडबाजा व्यतिरिक्त कायदा काय सांगतो, ते पाहुयात…
पंतप्रधान काय म्हणाले
स्त्री-धन म्हणजे काय
स्त्री-धन ही कायदेशीर संज्ञा आहे. तिचा अर्थ होतो, महिलांचा संपत्तीवरील अधिकार. सार्वत्रिक समज असा आहे की, स्त्री-धनात त्या वस्तूंचा समावेश आहे, ज्या लग्नात स्त्रीयांना माहेरकडून देण्यात येतात. पण कायद्यात विस्तृत व्याख्या आहे. अविवाहित महिलेला सुद्धा संपत्तीत अधिकार देण्यात आला आहे. लहानपणापासून ज्या भेट वस्तू मिळतात, त्यांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये लहान-मोठे भेट वस्तू, सोने, नकद, बचत, भेट मिळालेली संपत्ती, लग्नात भेट मिळालेल्या वस्तू आणि कायद्याच्या चौकटीत येणाऱ्या वस्तूंचा, स्थावर-जंगम मालमत्तेचा यामध्ये समावेश होतो.
कोणत्या कायद्याने मिळतो अधिकार
हिंदू महिलांना स्त्रीधनाचा अधिकार, हिंदू उत्तराधिकारी अधिनियम, 1956 चे कलम 14, हिंदू विवाह अधिनियम, 1955 चे कलम 27 अंतर्गत मिळते. त्यातंर्गत लग्नापूर्वी, लग्नावेळी आणि लग्नानंतर मिळणारी भेट वस्तू आणि संपत्ती, मालमत्तेवर अधिकार मिळतो. तर घरगुती हिंसा कायदा, 2005 चे कलम 12 मध्ये महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात आले आहे. या कायद्याच्या मदतीने महिला संपत्तीवर अधिकार सांगू शकतात.
ते स्त्री-धनाचे केवळ ट्रस्टी
लग्न झाल्यावर माहेर कडून आलेल्या सर्व भेटवस्तू ,सोन्याचे दागिने हे सासरी ठेवण्यात येतात. महिला मंगळसूत्र हे स्त्रीधन म्हणून ठेऊन घेते. पण याचा अर्थ या वस्तू, मालमत्तेवर सासरकडील मंडळींचा अधिकार होत नाही. ते केवळ ट्रस्टी असतात. कायदेशीररित्या त्यावर महिलेचा अधिकार असतो.