मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : शून्यातून आपले विश्व उभारणारे खूप कमी आहेत. भारतात 20 ते 30 वर्षांत अनेक अब्जाधीश उद्योगपतींचा उदय झाला आहे. यातील अनेकांना कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. यातच पॉलीकॅब इंडीयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर जयसिंघानी यांनी आपले विश्व उभे केले आहे. फोर्ब्ज इंडियाच्या 2023 च्या 100 भारतीयाच्या यादीत इंदर जयसिंघानी 32 व्या स्थानावर आहेत. परंतू हे स्थान गाठण्यासाठी त्यांना अत्यंत गरीबीतून वर यावे लागले.
इंदर जयसिंघानी यांच्या वडील ते 15 वर्षांचे असताना वारले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मोठा भावासोबत त्यांच्या कौटुंबिक व्यवसाय करण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर दोन लहान भाऊ-बहिण त्यांच्या सोबत व्यवसायात मदत करू लागले. प्रचंड मेहनतीनंतर त्यांनी 1983 मध्ये पॉलीकॅब कंपनीची सुरुवात केली. जी आज देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीकल उपकरणे बनविणारी कंपनी बनली आहे. या कंपनीची सुरुवात 1000 चौरस फूटाच्या छोट्या गॅरेजमधून झाली होती.
इंदर जयसिंघानी यांनी 1000 चौरस फूटाच्या जमीनीवर वर्कशॉप उघडले आणि केबल वायर तयार करण्यास सुरुवात केली होती. इंदर जयसिंघानी यांनी कंपनीचे मार्केटींग आणि विक्रीचे काम सांभाळले. आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत आज हे स्थान मिळविले.
2008 मध्ये इंदर जयसिंघानी यांना मोठे यश मिळाले. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने पॉलीकॅबमध्ये भागीदारी केली. त्यानंतर कंपनीचा व्यवसाय वाढतच गेला. 2014 मध्ये पॉलीकॅबने केबल वायर शिवाय अनेक उत्पादने इलेक्ट्रीक फॅन, स्विच आणि एलईडी लायटींगमध्ये उतरत उत्पादने सुरु केली.
2019 मध्ये पॉलीकॅब शेअर बाजारात लिस्टेड झाली. त्यानंतर कंपनीची प्रचंड यश मिळविले. आज पॉलीकॅब इंडीयाचे बाजारमूल्य 75,000 कोटीहून अधिक आहे. इंदर जयसिंघानी यांची एकूण संपत्ती एका वर्षात वाढून दुप्पट झाली आहे. 2023 जयसिंघानी यांची संपत्ती 6.4 अब्ज डॉलर म्हणजेच 53,000 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये त्यांची संपत्ती 3.35 अब्ड डॉलर होती.