सध्याच्या जीएसटी स्लॅबमध्ये (GST slab) केंद्र सरकार (Central Government) काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात आहे. जीएसटी स्लॅबमधील बदलाला मंजुरी भेटल्यास यापुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर पाच टक्क्यांऐजी वाढीव कर (Tax) द्यावा लागण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेची बैठक पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पाच टक्के जीएसटीचा स्लॅब काढून टाकण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाच टक्क्यांचा स्लॅब हटवून त्यातील उच्च वापराच्या वस्तू या तीन टक्क्यांच्या स्लॅबमध्ये तर उर्वरित वस्तू या आठ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये टाकल्या जाणू शकता. असे केल्यास सरकारचे कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पादन वाढणार आहे. मात्र त्याचा मोठा फटका हा कर रुपाने सर्वसामान्यांना बसू शकतो. आधीच महागाई वाढली आहे. आता या महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
सध्या जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 असे चार स्लॅब आहेत. परंतु सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर तीन टक्के कर आकारला जातो. तर काही अशी देखील उत्पादने आहेत, ज्यांना जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र आता पाच टक्क्यांचा स्लॅब रद्द करून त्याऐवजी तीन टक्क्यांचा स्लॅबची निर्मिती करण्यात येणार आहे. मौल्यवान वस्तूंचा समावेश हा तीन टक्क्यांच्या जीएसटीमध्ये तर पाच टक्क्यातील उर्वरीत वस्तुंचा समावेश हा आठ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये करण्यात येणार आहे.
पुढील महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटी स्लॅबमध्ये बदलाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास काही वस्तू या महाग होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अतिरिक्त जीएसटी भारावा लागेल. आधीच महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आणखी महागाईची भर पडू शकते.
जगभरात भाववाढीचा आगडोंब : भारतीयांच्या खिशावर भार, महागाईने अमेरिका-ब्रिटनसह उर्वरित देशही धास्तावले
दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती
Maruti Suzuki: SUV कार बाजारात पुन्हा दमदार एन्ट्रीसाठी मारुतीची टोयोटाला साद