नवी दिल्ली : निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्याआधीच बचत आणि योग्य गुंतवणुकीची गरज असते. तसं पाहिलं तर चांगल्या परताव्याचा दावा करणाऱ्या अनेक योजना बाजारात आहेत. मात्र, या सर्व योजनांवर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे कोणत्या योजनेत पैशांची गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि फायदेशीर असेल याचाही विचार करणं महत्त्वाचं ठरतं. यात बहुतांश लोकांचा विश्वास सरकार योजनांवर असतो. तुमचाही विश्वास सरकारी योजनांवरच असेल तर तुमच्यासाठी पीपीएफ (PPF) आणि एनपीएस (NPS) हे चांगले पर्याय आहेत. या दोन्ही योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो (PPF and NPS Know which scheme is more beneficiary to invest for post retirement days).
अगदी छोट्या रकमेच्या बचतीमधून मोठी रक्कम साठवण्यासाठी पब्लिक प्राविडंट फंड म्हणजेच PPF अकाऊंट चांगला पर्याय आहे. यात आयकर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेत सूट मिळते. ही एक सुरक्षित आणि हमीपूर्ण परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ अकाउंटचा उपयोग करुन कर्ज घेण्याचीही सुविधा आहे. तुम्ही जमा झालेल्या रकमेवर 25 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधी कर्जाची मूळ रक्कम फेडावी लागते.
एनपीएस म्हणजे नॅशनल पेंशन सिस्टम (NPS – National Pension System). ही योजना PFRDA च्या वतीने चालवली जाते. यात इक्विटी एक्सपोजर असते. येथे गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी पैसे मिळतात. यात गुंतवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्तीचं वय 18 ते 65 वर्षे असावं लागतं. एनपीएसमध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत. एक टियर-1 आणि दुसरा टियर-2. या योजनेत 1,000 रुपयांपासून खातं सुरू करता येतं.
एनपीएसमधील गुंतवणुकीवर 10 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळतो. दुसरीकडे पीपीएफमध्ये 7.1 टक्के परतावा मिळतो. याचा विचार करता एनपीएस अधिक फायदेशीर आहे. कारण पीपीएफच्या तुलनेत तेथे 2.9 टक्के अधिक नफा मिळतो.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :