मुंबई : पीपीएफ (PPF) भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून केलेली बचत ही छोट्या स्वरुपातील बचत आहे. पीपएफमार्फत केलेली बचत अगदी सुरक्षित आणि करमुक्त असते. त्यामुळे या माध्यमातून बचत करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. पीपीएफमध्ये प्रती महिना, प्रत्येक तीन महिन्यांनी किंवा वर्षाच्या मुदतीने गुंतवणूक करता येते. मात्र, तुम्ही पीपीएफमध्ये प्रतिमहा गुंतवणूक करत असाल तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेआधीच खात्यात रक्कम जमा करावी. कारण त्यामुळे तुम्हाला जास्त लाभ होईल. (PPF investment strategy deposit before 5th day of every month)
5 तारखेच्या आधी पैसे का जमा करावेत
पीपीएफमध्ये प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आधी रक्कम जमा केली, तर त्याचा फायदा जास्त होतो. कारण 5 तारखेआधी खात्यात रक्कम जमा केल्यास खात्यात आधीच शिल्लक असलेली आणि 5 तारखेपर्यंत भरण्यात आलेली रक्कम अशा दोन्ही रकमेवर व्याज मिळते. हे व्याज वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात जमा केली जाते.
जर तुम्ही पीपीएफ खात्यात वर्षातून एकदाच पूर्ण रक्कम जमा करत असाल तरीसुद्धा 5 तारखेआधीच रक्कम जमा करा. कारण जमा केलेल्या रकमेवर पूर्ण व्याज मिळवायचे असेल तर वर्षातून एकदा जमा करत असलेला निधी 5 एप्रीलच्या आधीच जमा करवा. त्यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकेल.
सध्याच्या नियमानुसार पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने चक्रव्याढ व्याज मिळत आहे. वर्षाला 500 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पीपीएफ खात्यामध्ये बचत करता येऊ शकते.
(गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व गोष्टीची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या अर्थतज्ज्ञाचा सला जरुर घ्या)
संबंधित बातम्या :
फक्त 30 मिनिटांत कर्ज देणार ही सरकारी बँक, असं करा अप्लाय
नोकरीवर असताना EPF मधून पैसे काढायचे आहेत? मग जाणून घ्या इत्यंभूत माहिती
Bitcoin: बिटकॉईन ट्रेडिंगवर GST लागणार?, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
(PPF investment strategy deposit before 5th day of every month)