PPF वा SIP कोणत्या योजनेत होते तगडी कमाई ! पाहा कशी असते योजना

| Updated on: Mar 21, 2025 | 5:33 PM

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी एक गुंतवणूकीचा ऑप्शन असून तो शेअर बाजाराशी संबंधीत आहे. यात कोणीही ५०० रुपयांहून कमी पैसे देखील गुंतवू शकतो. तर पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हीडेंट फंड ही सरकारी योजना आहे. ती तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळवून देते...

PPF वा SIP कोणत्या योजनेत होते तगडी कमाई ! पाहा कशी असते योजना
Follow us on

ज्या लोकांन दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधत आहेत त्यांच्यासाठी सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान आणि पब्लिक प्रोव्हीडंट फंड खूपच फायदेशीर असतो. दोन्ही योजनाचे वैशिष्ट्ये भिन्न आहेत. यात तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करुन चांगला पैसा जमा करु शकता. परंतू तुमच्या आर्थिक फायद्यासाठी कोणता ऑप्शन चांगला आहे ? चला तर उदाहरणासाठी पाहीले तर जर तुम्ही १,३५,००० रुपये वार्षिक गुंतवत असाल तर तुम्हाला रिर्टन किती मिळणार हे पाहूयात…

एसआयपी काय आहे ?

म्युच्युअल फंडात एसआयपी एक गुंतवणूकीचा ऑप्शन असून तो शेअर मार्केटशी जोडलेला आहे. यात कोणीही ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम देखील गुंतवू शकतो. एसआयपीत तुम्हाला १२ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकते. तुम्ही तुमची क्षमता आणि मासिक कमाईच्या हिशेबाने गुंतवणूक करु शकता…

पीपीएफ काय आहे ?

पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हीडेंट फंड ही एक सरकारी योजना आहे. ज्यामुळे तुम्हाला कर लाभ मिळतो. यात तुम्ही एक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पीपीएफद्वारे मिळणारा व्याज दर ७.१ टक्के आहे. या तर योजनेचा कालावधी १५ वर्षे आहे.

हे सुद्धा वाचा

SIP विरुद्ध PPF

जर तुम्ही १५ वर्षांसाठी SIP आणि PPF दोन्हीत वर्षाला १,३५,००० रुपये गुंतवणूक करीत आहात. तर तुम्हाला किती परतावा मिळेल याची आकडेवारी पाहूयात…

एसआयपी गुंतवणूकीचा तक्ता

जर तुम्ही एसआयपीत वर्षाला १,३५,००० रुपये दर महिन्यासा ११,२५० च्या हिशेबाने गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक १५ वर्षांत २०,२५,००० रुपये होईल. यात १२ टक्के व्याजाने सरासरी वार्षिक परतावा मिळतो. तर १५ वर्षात एकूण जमा रक्कम सुमारे ५६,७६,४८० रुपये होईल. त्यात गुंतवलेल्या रक्कमेचे प्रॉफिट रुपये ३५,५१,४८० रुपये असेल.

एसआयपी रिटर्न

जर तुम्ही दर महिन्यास ११,२५० रुपयांची गुंतवणूक करत असाल तर १५ वर्षाचे २०,२५,००० रुपये होतील. यात तु्म्हाला महिन्याला ११,२५० रुपयांची तुम्हाला गुंतवणूक केली तर वर्षाला ती २०,२५,००० रुपये होईल. ज्यात तुम्हाला अंदाजित ३६,५१,४८० रुपये परतावा मिळेल.ज्याचे संपूर्ण मुल्य ५६,७६,४८० रुपये असेल.

पीपीएफ गुंतवणूक तक्ता

जर तुम्ही जर पीपीएफला दरवर्षी १,३५,००० रुपये गुंतवणूक करत असाल तर १५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक २०,२५,००० रुपये होईल. यात तुम्हाला ७.१ टक्क्याने वार्षिक परतावा म्हणून व्याजाच्या रुपाने २०,२५,००० रुपये मिळतील. तर अंतिम फंड सुमारे ३६, ६१,३८८ रुपये असेल.