Marathi News Business Price calculations will be determined by China's move in the global market, crude oil prices will increase, know today's petrol diesel price
Petrol Diesel Price Today : राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, भाव जाणून घ्या एका क्लिकवर
Petrol Diesel Price Today : राज्यातील ग्राहकांना आज पेट्रोल-डिझेलने दिलासा दिला. भावात मोठी घसरण दिसून आली. तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती जाणून घ्या..
Ad
जाणून घ्या आजचे भाव
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात ओपेक प्लस देशांनी मोठी खेळी खेळत कच्चा तेलाचे भाव वाढवले आहेत. आता या खेळीत चीन मोठी भूमिका निभावणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चीन इंधनाची मागणी वाढवू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. चीनची अर्थव्यवस्था कोविडच्या संकटानंतर पुन्हा उभारी घेत आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. आज क्रूड ऑईलमध्ये(Crude Oil) मोठी उलथापालथ झाली नाही. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सकाळीच भाव जाहीर केले. राज्यातील ग्राहकांना आज इंधनाने मोठा दिलासा दिला. भावात मोठी घसरण दिसून आली. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price) काय आहे.
कच्चा तेलाचा भाव काय
आज कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ नोंदविण्यात आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.92 प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) वाढ झाली. हा भाव 84.86 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. पेट्रोलियम कंपन्या सकाळी 6 वाजताच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात.