नवी दिल्ली : देशात महागाईचा (Inflation) आगडोंब उसळला आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वच वस्तूंच्या (Price) प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलने तर रॉकेट भरारी घेतली आहे. तशीच जरबदस्त भाव वाढ डाळी, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंमध्ये झालेली आहे. आता पुन्हा काही वस्तूंच्या किंमती वाढण्याचे संकेत खूद्द केंद्र सरकारनेच (Central Government) दिले आहेत.
साध्या तांदळाच्या किंमती पुन्हा भडकू शकतात. खरिपाचे मातेरे झाले आहेत. काही राज्यात तुफान पाऊस झाला आहे. तर काही भागात पावसाने डोळे वटारले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. खरिपाचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षीपेक्षाही उत्पादनाचा आकडा कमी होणार आहे.
सरकारने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत साठा झपाट्याने कमी होण्याची सरकारला भीती होती. पण तोपर्यंत गैर बासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा 11 टक्के वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातंर्गत बाजारपेठेला बसला आहे. आता किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमती भडकणार आहेत.
19 सप्टेंबरपर्यंत तांदळाच्या किरकोळ किंमतीत आठवड्याभरात 0.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर महिन्याभरात 2.46 टक्के आणि वर्षभरात 8.67 टक्के वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पाच वर्षांत किंमतीत सरासरी 15.14 टक्क्यांची वाढ झाली आहे.
यंद खरीपाचे मातेरे झाल्याने केंद्र सरकारने तांदळाच्या उत्पादनात 6 टक्क्यांची घसरण होईल. उत्पादन घटून 104.99 दशलक्ष टन होईल असा अंदाज सरकारने बांधला होता. पण निर्यातीने बाजारात तांदळाचा बंपर स्टॉक कमी झाला आहे.
तर गेल्याच आठवड्यात साठेबाजांवर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला होता. याचा अर्थ तांदुळ, गहू याची मोठ्या प्रमाणात साठेबाजी करुन ठेवण्यात आली आहे. यामुळेही बाजारात तांदळाचा तुटवडा होऊन किंमती भडकण्याचा धोका आहे.