नवी दिल्ली | 16 March 2024 : छतावर सोलर पॅनल लावून वीज निर्मितीच्या पीएम सूर्योदय योजनेला (PM Suryoday Yojana) मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळते. तर वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होईल. यावर्षीच्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दुस्तूरखुद्द पंतप्रधानांनीच याविषयीची आकडेवारी सार्वजनिक केली. आकडेवारीवर नजर टाकल्यास अक्षय ऊर्जा निर्मितीत भारत जगात नवीन रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे.
इतक्या कोटी लोकांची नोंदणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजनेला भारतीयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. ही योजना सुरु होण्याच्या एकाच महिन्यात 1 कोटी कुटुंबांनी या योजनेत नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. हा रेकॉर्डब्रेक आकडा आहे. देशात एक कोटी घरांना सौरऊर्जेचे कवच देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी केले होते. हे लक्ष एकाच महिन्यात पूर्ण झाले आहे. भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया X वर ही आनंदवार्ता शेअर केली. पीएम सूर्य घर योजनेसाठी नोंदणी सुरु झाली. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. असम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळानाडू आणि उत्तर प्रदेशात 5 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अशी आहे योजना
कोणाला करता येईल अर्ज
असा करा अर्ज