मुंबई : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी कर आकारणी आणि कर्ज योजना यांची पुनर्रचना करण्याचं मतही त्यांनी बोलून दाखवलं. (Prithviraj Chavan demands supplementary budget in June)
“भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकटामुळे 1 फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प अप्रासंगिक ठरला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर केला पाहिजे. नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी, कर्ज योजना, प्राधान्यानुसार सुधारित खर्च, विकास आराखड्यात कपात करुन सादर होणाऱ्या बजेटला लोकसभेने मंजूर करणे आवश्यक आहे” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
With the crisis in Indian economy, the #budget of 1st Feb has become irrelevant. #FM must present a supplementary budget in June. New revenue streams, taxation and borrowing plans, and revised expenditure priorities, cuts in development outlays, must be approved by the #LokSabha.
— Prithviraj Chavan (@prithvrj) June 4, 2020
धार्मिक स्थळांकडून सोनं कर्ज रुपाने घ्यावं. त्यावर व्याज द्यावं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. धार्मिक स्थळांकडून सक्ती करुन किंवा हिसकावून घ्या, असं मी म्हटलं नव्हतं, असं स्पष्टीकरणही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला याआधीदेखील अर्थचक्र सुरळीत चालावं यासाठी नोटा छापण्याचा सल्ला दिला आहे. अर्थमंत्र्यांना सल्ला आहे की, या अडचणीच्या प्रसंगी मिळेल तेवढं कर्ज काढावं लागेल. केंद्र सरकारकडून मिळेल, तेवढं कर्ज काढावं लागेल आणि शेवटी केंद्राला नोटा छापाव्या लागतील. या परिस्थितीत मला अजून यावाचून दुसरा काहीही पर्याय दिसत नाही, असं ते म्हणाले होते.
संबंधित बातमी :
मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, टीका नाही : पृथ्वीराज चव्हाण
माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण
निरुपम-पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर, टीका करणाऱ्या पृथ्वीबाबांवरही निरुपमांचा निशाणा
(Prithviraj Chavan demands supplementary budget in June)