नवी दिल्ली : आज राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल कोकणातील रायगडमध्ये मिळत आहे. राज्यातील इतर शहरात भावात चढउतार आहे. पण राज्यातील काही शहरात पेट्रोल-डिझेलची (Petrol-Diesel Price) महागाई कमी होताना दिसत नाही. या शहरवासियांना कायम दरवाढीचा सामना करावा लागत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (Crude Oil) किंमतीत वाढ झाली. उत्पादन घटविल्याने हे संकट ओढावले आहे. भारतावर त्याचा काय परिणाम होईल हे मे आणि जून महिन्यात दिसेल. कालपेक्षा एक डॉलरच्या आसपास ही दरवाढ झाली. तेल कंपन्यांनी आजचे भाव सकाळीच जाहीर केले. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल आज झाले का स्वस्त?
महागाईची झळ नाही
रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.
कच्चा तेलाची दरवाढ
15 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 82.52 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 86.31 डॉलर प्रति बॅरलवर आहे. दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.
रायगडमध्ये स्वस्त इंधन
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करतात. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. रायगडमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 105.89 तर डिझेलची किंमत 92.39 रुपये आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
उत्पादन घटवले