‘या’ शेअरने 7 दिवसात दिले 100 टक्के रिटर्न, किंमत 50 रुपयांहून कमी

| Updated on: Jun 03, 2021 | 2:27 PM

देशातील दोन बड्या गुंतवणूकदारांनी Prozone Intu Properties शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत. (Prozone Intu Properties Share Prices rise)

‘या’ शेअरने 7 दिवसात दिले 100 टक्के रिटर्न, किंमत 50 रुपयांहून कमी
rupees
Follow us on

मुंबई : मुंबईतील बांधकाम कंपनी प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज (Prozone Intu Properties) शेअर्समध्ये गेल्या एका आठवड्यापासून सतत वाढ होत आहे. या कंपनीचा साठा फक्त 7 दिवसात जवळपास 100 टक्क्यांनी वाढला आहे. देशातील दोन बड्या गुंतवणूकदारांनी Prozone Intu Properties शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे यात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे तज्ञांनीही यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी BSE च्या शेअर ऑलटाईम हाई 40.25 रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला आहे. (Prozone Intu Properties Share Prices rise 100 percent in just 7 days)

देशातील दोन मोठ्या गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि डी-मार्ट संस्थापक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांनी Prozone Intu Properties शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. यात झुंझुनवालाचे 2.06 टक्के म्हणजे 31,50,000 शेअर्स आहेत. तर दमाणींकडे या कंपनीचे 1.26 टक्के म्हणजे 19,25,000 शेअर्स आहेत.

7 दिवसात 100 टक्के रिटर्न

Prozone Intu Properties ने केवळ शेअर 7 ट्रेडिंग सत्रांमध्ये 100 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 26 मे रोजी शेअर्सची किंमत 20.4 रुपये होती. ती जवळपास 100 टक्क्यांनी वाढून 40.25 रुपये झाली आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शेअर बाजारात वेगाने वाढ झाल्यामुळे कंपनीची मार्केट कॅप दुप्पट झाली आहे. कंपनीची बाजारपेठ 26 मे च्या शेअर भावाने 302.92 कोटी रुपये होते. आता ती वाढून 614.23 कोटी झाली आहे.

कंपनीची थोडक्यात माहिती

Prozone Intu Properties ही debt free कंपनी आहे. म्हणजे त्यावर कोणतेही कर्ज नाही. त्याची एकूण मालमत्ता 2000 कोटींपेक्षा जास्त आहे. या कंपनीचे औरंगाबाद आणि कोयंबत्तूर येथे शॉपिंग सेंटर आहेत. तसेच भविष्यात नागपूर आणि मुंबई येथे खरेदी केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.

डिसेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीची तोटा वाढून 45 कोटी रुपये झाला. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीची तोटा 2.7 कोटी रुपये होता. त्याचवेळी एकूण उत्पन्न 73 टक्क्यांनी घसरून 17.93 कोटी रुपये झाले. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 67.27 कोटी रुपये होते. (Prozone Intu Properties Share Prices rise 100 percent in just 7 days)

संबंधित बातम्या : 

Gold Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

Salary Hike : पगार वाढल्यानंतर लगेचच करा ‘ही’ कामं, पगारवाढीचा आनंद होईल दुप्पट

Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?