मुंबई | 17 डिसेंबर 2023 : पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवत आहे. भविष्यात पाण्यावरून युद्ध होतील अशी परिस्थिती आहे. अशा पाण्याच्या टंचाईत पुण्याच्या नितीन शर्मा नावाच्या एका उद्योजकाने पाण्याशिवाय कार धुण्याचे तंत्र शोधून काढले आहे. या वॉटरलेस कार धुलाईमुळे दररोज 12 लाख लिटर पाण्याची बचत होत असून त्यांच्या बिझनेसची वार्षिक उलाढाल आता 2.5 कोटी इतकी झाली आहे. त्यांचा कार केअर ब्रॅंड मार्फत वॉटरलेस कार वॉश आणि इतर सेवा पुरविल्या जातात. तर पाहूयात काय नेमकी या तरुणाच्या उद्योगाची संकल्पना आहे.
नितीन शर्मा साल 2004 मध्ये एमबीए ड्रॉपआऊट झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला कार वॉश व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला. सर्वकाही सुरळीत सुरु होते. परंतू 2016 मध्ये पाण्याच्या टंचाईमुळे त्यांचा व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. साल 2017 पर्यंत हा पाण्याच्या दुर्भिक्ष्याची अडचणी सुरुच होत्या. आम्ही दररोज 50 कार धुवून काढीत होतो. आमच्याकडे केवळ एक बोअरवेल होती. त्यावरच पाण्याची उपलब्धता अवलंबून होती असे नितीन शर्मा यांनी सांगितले. जून 2019 मध्ये पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली.
देशातील 45 टक्के लोकसंख्येला तीव्र ते गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. जमिनीतील पाणी हा एकमेव पाण्याचा सोर्स असून तो ही कमीकमी होत चालला आहे. साल 2030 पर्यंत 40 टक्के जनतेला पिण्याचे पाणी मिळणार नाही अशी आकडेवारी सांगते असे ते म्हणाले. जागतिक बॅंकेच्या मते केवळ सहा टक्के भारतीय लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळते. त्यामुळे पाण्याशिवाय कार धुण्याची संकल्पना पुढे आली.
नितीन यांनी कळाले की त्यांच्या काकांनी साल 2010 मध्ये अमेरिकेत वॉटरलेस कार वॉशिंग प्रोडक्ट लॉंच केले होते. परंतू त्यात कारला क्रॅशेस येत असल्याने तसेच कारच्या पेंटवरही परिणाम होत असल्याने ही संकल्पना पुढे चालली नाही. ही आपल्यासाठी युरेका मोमेंट्स होती. मी त्या प्रोडक्ट फॉर्म्युल्यात बदल केला आणि कारचे कोणतेही नुकसान न होता तीला धुण्याचा स्प्रे तयार केल्याचे नितीन शर्मा यांनी सांगितले.
2022 मध्ये कारवॉशिंग सर्व्हीसचे जागतिक मार्केट 31.06 अब्ज डॉलरचे आहे आणि ते साल 2032 पर्यंत 43.81 अब्ज डॉलर होणार आहे. हे भारत आणि चीनमध्ये कारची निर्मिती वाढत असल्याने एशिया पॅसेफिकमध्ये कार वॉशिंग मार्केट विस्तारत आहे. साल 2017 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री एक्सपर्ट तसेच कार पेण्टच्या तज्ज्ञांच्या मदतीने पाण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कार स्वच्छ धुऊन काढण्याचा फॉर्म्युला शोधून काढण्यासाठी काम सुरु केले. दोन वर्षांनी या टीमने द्रव स्वरुपातील इको फ्रेंडली उत्पादन शोधून काढले.
‘गो वॉटरलेस कंपनी’च्या कार वॉशमध्ये कार हाय लुब्रिसिटी स्प्रेने पॉलिश आणि वॉश केली जाते. त्यामुळे धुळ आणि घाण नष्ट होते. पाण्यासारखे परंतू पाण्यापेक्षा झटपट कार स्वच्छ केली जाते. केवळ स्प्रे करा आणि कार पुसून काढली की झाली स्वच्छ. सुखलेल्या आणि घट्ट चिखल नसलेल्या कारसाठी हा स्प्रे उत्तम प्रकारे काम करतो असे शर्मा यांनी सांगितले. आमच्या 175 फ्रनचाईजीस जवळपास 8000 काम पाण्याशिवाय धुतल्या जातात. यासाठी 100 लिटर पाणी कार धुण्यासाठी लागेल. परंतू वॉटरलेस तंत्राने दररोज 12 लाख लिटर पाण्याची बचत होत असल्याचे नितीन शर्मा यांनी सांगितले.