नवी दिल्ली : करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण कष्ट उपसतात. जीवाचं रान करतात. पण करोडपती होण्याचे स्वप्न (Crorepati Dreams) काहीच लोकांना पूर्ण करता येते. पण योग्य रणनीती आखल्यास तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. त्यासाठी शिस्तीत आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. रोजच्या काही अनावश्यक खर्चाला कात्री लावली तर तुम्हाला गुंतवणूक (SIP Investment) करता येऊ शकते. या नियोजनबद्ध गुंतवणुकीतून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. सिगारेटची (cigarettes) सवय लाथाडून तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
जर तुम्ही दिवसाकाठी जर 5 सिगारेट ओढत असाल तर साधारणता हा खर्च 100 रुपये होईल. एका महिन्यात, 30 दिवसात एकूण सिगारेटवरील खर्च 3000 रुपये होईल. हा खर्च फार मोठा आहे. हा खर्च गुंतवणूकीत बदलवल्यास तुम्हाला श्रीमंत होता येईल.
जर तुम्ही सलग 30 वर्षांसाठी एखाद्या म्युच्युअल फंडात दर महिन्याला 3000 रुपयांची SIP सुरु केली तर त्याचा फायदा दिसून येईल. साधारणतः 12 टक्के वार्षिक परतावा गृहित धरला तरी तुम्हाला 1.1 कोटी रुपये मिळू शकतात. यामध्ये महागाईचा विचार करण्यात आलेला नाही.
गुंतवणूकदाराने दरमहा तीन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तो 10.8 लाख रुपये गुंतवणूक करेल. त्यावर 95.1 लाख रुपयांचा नफा मिळेल. एकूण जवळपास 11 लाख रुपयांची रक्कम त्यात जमा केल्यास तुमच्याकडे एकूण 1.1 कोटी रुपये असतील.
जर तुम्हाला अधिकचा परतावा हवा असेल तर, तुम्ही ही रक्कम वाढवू शकता. तुम्ही 30 वर्षाऐवजी 35 वर्षांकरीता दर महा 3000 रुपये जमा करु शकता. ही रक्कम 1.9 कोटी रुपयांपर्यंत पोहचेल. म्हणजे गुंतवणूकदाराने केवळ 12.6 लाख रुपये हप्त्याने जमा केल्यास 35 वर्षांनी त्याला आणखी मोठा परतावा मिळेल.
जर तुम्ही दरमहा गुंतवणूक वाढवली तर तुमची रक्कम वाढले. त्यावरील व्याज वाढेल. व्याजाचा दर जरी 12 टक्के गृहित धरला असला तरी, एखादी स्कीम तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकेल. त्यानुसार तुम्हाला परतावा ही चांगला मिळेल.
5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 12 टक्के परताव्यानुसार तुमची रक्कम 3.2 कोटी रुपयांपर्यंत होईल. म्हणजे गुंतवणूकदाराला जमा रक्कमेवर 3 कोटी रुपयांचा फायदा होईल.