रघुराम राजन आणणार होते रु.10000 आणि रु.5000 ची नोट, परंतू यामुळे निर्णय मागे पडला

| Updated on: May 24, 2023 | 7:48 PM

रघुराम राजन गव्हर्नर असताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या लोक लेखा समितीने ( पीएसी ) ऑक्टोबर 2014 मध्ये पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपयांच्या नोटा आणण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतू या कारणाने तो मागे पडला...

रघुराम राजन आणणार होते रु.10000 आणि रु.5000 ची नोट, परंतू यामुळे निर्णय मागे पडला
RAGHURAM RAJAN
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : सध्या आपल्या देशात दोन हजाराची नोट बदलण्यावरून वातावरण तापलं आहे. सध्या दोन हजाराची नोट आपली सर्वात मोठे चलनी नोट आहे. आता आरबीआयने तिला चलना बाहेर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. देशभरातील बॅंकांमध्ये पुढील चार महिने तिला बदल्याची मोहीम सुरू राहणार आहे. परंतू तुम्हाला हे माहीती आहे का माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा आणायची योजना आखली होती. याआधीही आपल्याकडे दहा हजाराची नोट अस्तित्वात होती. केव्हा ते पाहूया..

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये रघुराम राजन हे आरबीआयचे गव्हर्नर होते. त्यावेळी साल 2013 ते 2016 पर्यंत ते गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. त्यांना दुसरी टर्म मिळेल अशी आशा होती. परंतू नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या ऐवजी उर्जित पटेल यांना गव्हर्नर केले.

राजन यांची 10 हजाराची नोटेची योजना होती

रघुराम राजन गव्हर्नर असताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या लोक लेखा समितीने ( पीएसी ) ऑक्टोबर 2014 मध्ये पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपयांच्या नोटा आणण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यावेळी वाढत्या महागाईने एक हजार नोटेचे मुल्य कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात येणार होता. परंतू हा प्रस्ताव काही प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकला नाही. त्यानंतर अठरा महिन्यांनी मे 2016 मध्ये सरकारने आरबीआयला सूचना केली की ते 2000 रुपये मूल्यांच्या नवीन नोटांची सिरीज आणण्याच्या सैद्धांतिकरित्या विचारात आहेत. तर जून 2016 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईचे आदेशही दिले गेले. तेव्हा देशाचे वित्तमंत्री अरूण जेठली होते. त्यांनी म्हटले होते की सरकार 5000 आणि 10000 रुपयांच्या चलनी नोटा आणण्याच्या विरोधात आहे. परंतू तत्काल प्रभावाने चलनाची अदला-बदली करण्यासाठी 2000 रुपये छापण्यावर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले.

राजन यांनी मान्य केला नकली नोटांचा धोका

दहा हजार किंवा पाच हजार रुपयाच्या नोटा जर छापल्या गेल्या असत्या तर त्यांच्या नकली नोटा चलनात येण्याचा धोका होता, हे नंतर रघुराम राजन यांनी देखील मान्य केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धोका होता. आपला शेजारील देश पाकिस्तानातून नकली नोटा येण्याचा मोठा धोका असतो.

10000 रु.नोट आणण्याचे कारण

मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये देशात किरकोळ ( रिटेल ) महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार गेला होता. त्यासाठी मोठ्या रकमेच्या चलनाच्या नोटा लॉंच करण्याची योजना रघुराम राजन यांनी तयार केली होती. जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा देशात महागाईचा दर 10.7 टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्यांचे पद सोडेपर्यंत तो अर्धा कमी झाला. देशात सर्वात आधी दहा हजाराची नोट 1938 मध्ये आणली गेली होती. ती साल 1946 पर्यंत चलनात होती. त्यानंतर 1954 मध्ये पुन्हा या नोटेला लॉंच केले गेले आणि पुन्हा साल 1978 मध्ये बंद करण्यात आले.