नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे अनेक गुंतवणूकदारांचे आदर्श आहेत. त्यांच्या टिप्स आजही गुंतवणूकदार फॉलो करतात. त्यांना अनेक जण बाजारातील गुरु मानतात. तर या गुरुकडून मिळालेल्या विद्येच्या जोरावर रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी ही शेअर बाजारात मोठी कमाई केली. या कंपनीत गुंतवणूक केल्याने त्यांना हजारो कोटींचा फायदा झाला. टाटा समूहातील टायटन कंपनीच्या (Titan) शेअरमुळे रेखा झुनझुनवाला यांनी ही कामगिरी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 नंतर कंपनीचा शेअर रॉकेटसिंग झाला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी हा शेअर जवळपास 2,310 रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर या शेअरने भरारी घेतली. दोन आठवड्यात या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. हा शेअर 2,310 हून वाढून 2,535 रुपये प्रति शेअर झाला आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत टायटन कंपनीच्या शेअर होल्डिंग डाटा नुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,58,95,970 शेयर आहेत. हा वाटा कंपनीच्या एकूण भांडवलाच्या 5.17 टक्के इतका आहे. आज टायटनच्या शेअरची किंमत जवळपास
2,535 रुपये आहे. गेल्या दोन आठवड्यात हा शेअर जवळपास 2,310 हून वाढून 2,535 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कंपनीच्या शेअरने 225 रुपयांची उसळी घेतली आहे.
BSE च्या संकेतस्थळावर टायटन कंपनीच्या शेअर होल्डिंगच्या पॅटर्नची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, टायटन कंपनी लिमिटेडमध्ये सध्याच्या उलाढालीचा रेखा झुनझुनवाला यांना मोठा फायदा झाला आहे. झुनझुनवाला यांचे एकूण संपत्ती जवळपास 10,32,65,93,250 रुपये म्हणजेच 1,000 कोटी रुपयांहून अधिकचा फायदा झाला आहे.
जर रेखा झुनझुनावाला यांनी टाटा समूहातील हिस्सेदारी कमी केली नसती तर त्यांची एकूण संपत्ती अजून वाढली असती. जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 1,50,23,575 शेअर होते. म्हणजेच या कंपनीत 1.69 टक्के हिस्सेदारी होती.
त्यांचे पती राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीच 3,41,77,395 शेअर वा या कंपनीत 3.85 टक्के हिस्सेदारी होती. झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे 4,92,00,970 शेअर होते. कंपनीत त्यांची 5.54 हिस्सेदारी होती. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीतील 33,05,000 शेयर अथवा कंपनीतील 0.37 टक्के हिस्सेदारी विक्री केली आहे.
राकेश झुनवाला यांनी 2003 साली टाटा समूहाच्या टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या एका शेअरने त्यांचे नशीब पालटल्याचे बोलले जाते. त्यांनी सहा कोटी शेअर्स अवघ्या 3 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे खरेदी केले आणि या शेअर्सनी त्यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल ठरवले. आजही या शेअर्समध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि हा शेअर किंमती मानण्यात येतो.
आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, ल्युपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.