केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा ग्रुपचं नाव एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे आता 86 वर्षांचे झाले आहेत. मात्र या वयातही ते त्यांची सर्व कामं स्वत:ची स्वत: करतात. ‘टाटा ग्रुप’ला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांनी लग्नही केले नाही. पण वयाच्या या टप्प्यावर जेव्हा त्यांना जवळच्या व्यक्तीची गरज भासते तेव्हा त्यांना जवळचे असे कोणीच दिसत नाही. त्यांचा जिमी नवल टाटा, नावाचा सावत्र भाऊ आहे, ते देखील 85 वर्षांचे असून अविवाहित आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून रतन टाटा यांच्यासोबत एक तरूण मुलगा सतत दिसतो. आज आपण त्याच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
गेल्या काही वर्षांपासून रतन टाटा यांच्यासोबत सतत सावलीसारखा दिसणारा हा तरूण आहे शांतनु नायडू. तो टाटा यांचा पर्सनल असिस्टंट आहे. दिवस असो वा रात्र, कोणताही कार्यक्रम असो शांतनु हा नेहमीच टाटा यांच्यासोबत दिसतो.
गेल्या वर्षी रतन टाटा यांनी त्यांचा वाढदिवसही शंतनु याच्यासोबत साजरा केला. शांतनु सतत सावलीसारखा त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे रतन टाटाही त्याला मुलाप्रमाणेच मानतात. टाटा समूहासोबत काम करणारे शांतनु हा रतन टाटांच्या व्यवसायासोबतच त्यांची गुंतवणूक पाहतो.
कोण आहे शांतनु नायडू ?
मूळचा पु्ण्याचा असलेल्या शांतनुचा 1993 साली झाला. तो इंजिनिअर, बिझनेसमन, लेखक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे. त्याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. 2018 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो भारतात परत आल्यानंतर तो Tata Trusts च्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करू लागला. टाटा ग्रुपमध्ये काम करणारी त्याची ही पाचवी पिढी आहे. त्याच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी याआधी टाटा ग्रुपमध्ये काम केलंय.
रतन टाटांशी अशी झाली ओळख
खरंतर शंतनु याचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. एकदा शांतनु नायडू आपल्या एनजीओच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याने रस्त्यावरील बेवारस कुत्र्याला अपघातापासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात चमकणारा पट्टा घालण्याचे कॅम्पेन चालवले होते. भटक्या कुत्र्यांसाठी त्याने केलेल्या कामामुळे रतन टाटा खूप प्रभावित झाले आणि त्यांनी शांतनूला आपला असिस्टंट बनण्याची ऑफर दिली. रतन टाटा यांचंही कुत्र्यांवर खूप प्रेम आहे.
शांतनूची सॅलरी किती
शांतनू याचा महिन्याचा पगार लाखोंमध्ये आहे आणि त्याच नेटवर्थ कोट्यवधींमध्ये आहे. त्याला महिन्याला जवळपास 7 लाख रुपये पगार मिळतो. सध्या त्याचे नेटवर्थ 6 कोटींच्या आसपास आहे.
तसेच शांतनूची गुडफेलोज ही कंपनी आहे. तो या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्याच काम ही कंपनी करते. या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.