उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे काल संध्याकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारतीय उद्योग क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. उद्योजक म्हणून आणि व्यक्ती म्हणून ते उत्तुंग होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता या समूहाचे पुढे काय होणार, कोण उत्तराधिकारी असणार याची खलबतं सुरू झाली आहे. तर आज शेअर बाजारात उद्योग समूहाच्या शेअरवर या घटनेचा परिणाम दिसून आला. आज टाटा समूहाच्या शेअरची कामगिरी काय?
रतन टाटा यांच्यामुळे मोठी पोकळी
रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातील महर्षि आहेत. 28 डिसेंबर 1937 साली गुजरातमधील नवसारी येथे त्यांचा जन्म झाला. 1991 मध्ये त्यांच्या खांद्यावर टाटा समूहाची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी आल्या आल्याच टाटा समूहाला विविध क्षेत्रात अग्रेसर केले. त्यांच्या काळात या उद्योग समूहाने अनेक प्रयोग राबवले. अनेक क्षेत्रात नाव कमावले. आयटी, हॉटेल, स्टील ते ऑटोमोबाईलपर्यंत अनेक क्षेत्रात टाटा समूहाने स्वत:चा दबदबा तयार केला. टाटा नॅनोने सर्वसामान्यांचे चारचाकीचे स्वप्न पूर्ण केले.
शेअर बाजाराची स्थिती काय?
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पडझडीचे सत्र सुरू होते. आज सेन्सेक्स आणि निफ्टीने आगेकूच केली. सेन्सेक्सने 317.09 अंकांची चढाई केली. तो सध्या 81,781.35 वर व्यापार करत होता. तर निफ्टी आज 45.25 अंकांनी वधारला. 25,027.70 अंकांवर व्यापार करत आहे. या आठवड्यात सोमवारी बाजार घसरला. पण आज बाजाराची सुरुवात चांगली होती. टाटा यांच्या मृत्यूनंतर टाटा समूहाचे काही शेअर दमदार कामगिरी करत आहेत. तर काहींवर या बातमीचा परिणाम दिसून आला. या शेअरमध्ये पडझड दिसली.
कशी आहे टाटा समूहातील शेअरची कामगिरी?
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसचा शेअर जोमात आहे
टाटा स्टीलचा शेअर, बाजारात चांगली कामगिरी करत आहे
टाटा मोटर्सचा स्टॉक बाजारात आगेकूच करत आहे
टायटन कंपनीचा शेअर बाजारात ट्रेडिगमध्ये ग्रीन आहे
टाटा केमिकल्सने पण बाजारात दमदार कामगिरी केली आहे
टाटा पॉवरचा शेअर, बाजारात धावत आहे
ट्रेंड लिमिटेड या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे
टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअरने भरारी घेतली आहे
टाटा टेक्नॉलॉजीचा शेअर पण ग्रीन दिसत आहे
(सूचना : बीएसईवरील ट्रेडनुसार हा डाटा आहे. वेळेनुसार या डाटामध्ये फरक दिसू शकतो. शेअरच्या कामगिरीवर वेळेनुसार परिणाम दिसू शकतो.)