नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : देशभरातच नाही तर जगभरात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या व्यक्तिमत्वाची अनेकांवर अमीट छाप आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची भूरळ अनेकांना आहे. त्यांना दुषणं देणारी अथवा त्यांची निंदा करणारी मंडळी शोधूनही सापडणार नाही. जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहे. उद्योजक, उद्योगपती असून ही त्यांचे पाय नेहमी जमीनवर असतात. टाटा समूहाला त्यांनी गगन भरारी घ्यायला शिकवले. अनेक जागतिक ब्रँड त्यांच्याकडे पाणी भरतात. नम्र, विनयशील, देशप्रेमी, समाजसेवक, उद्योगपती अशा अनेक पदव्या, किताब त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढे थिटे पडतात. त्यांच्याविषयकी असंख्य कथा, गोष्टी नव्याने आपल्याला येऊन भेटतात. गरजूंना मदत करण्यासाठी, समाजाला काहीतरी देणे लागतो, पण त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कथांनी तुमची पण छाती फुगेल, तुम्ही पण या व्यक्तिमत्वाच्या पुन्हा नक्कीच प्रेमात पडाल.
रतन टाटा 17 वर्षांचे असताना त्यांना वैमानिकाचा परवाना(Pilot License) मिळाले होते. विमानाचं इंजिन एकदा अचानक खराब झालं. त्यावेळी त्यांच्यासह तीन जण होते. विमानतळ 9 मील दूर असताना त्यांनी सुरक्षित विमान उतरवलं होतं. महाविद्यालयीन काळात हेलिकॉप्टर उडवताना ते थोडक्यात बचावले होते. त्यानंतर ही दोनदा इंजिन खराब झाल्यावर त्यांनी सेफ लँडिंग केली होती.
तर ही घटना ऑगस्ट 2004 मध्ये घडली होती. पुणे येथील टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश एम तेलंग यांची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तपासणी करुन तातडीने मुंबईत हलविण्यासाठी एअरलिफ्टचा सल्ला दिला. रविवार असल्याने एअर अॅम्बुलन्सच्या व्यवस्थेत अडथळा आला. रतन टाटा यांना ही सर्व परिस्थिती समजली. त्यांनी तात्काळ कंपनीच्या विमानाकडे धाव घेतली. कंपनीचे विमान उडवण्याचा निर्णय त्यांनी तात्काळ घेतला. लागलीच एअर अॅम्बुलन्सची व्यवस्थापने व्यवस्था झाली. तेलंग यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले.
आजारी कर्मचाऱ्याची रतन टाटा यांनी घरी जाऊन विचारपूस केली. त्यांचा हा कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून आजारी होता. रतन टाटा कोणत्याही लवाजम्याविना, सुरक्षेविना पुण्यात त्या कर्मचाऱ्याच्या घरी पोहचले. त्याची विचारपूस केली.
एका निराश उद्योजकाला शंभर हत्तीचे बळ
संजीव कौल यांनी हा गोष्ट LinkedIn ला शेअर केली आहे. त्यांना स्टार्टअप सुरु करायचे होते. 2004 मध्ये त्यांनी फंडिग मिळावी यासाठी मुंबईत बैठक ठेवली होती. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. फ्लाईटने दिल्लीला जात असताना, त्यांच्या शेजारी रतन टाटा होते. त्यांची ही निराश लपली नाही. टाटा यांनी त्यांचा टेलिफोन क्रमांक घेतला. त्यांना रात्री कॉल आला. त्यांना टाटा ग्रुपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरसमोर प्रेझेंटेशन करण्याची संधी देण्यात आली. त्यांनी संचालकांसमोर त्यांच्या स्टार्टअपचे सादरीकरण केले. संचालकांना ते आवडले. त्यांना लागलीच या स्टार्टअपसाठी पैसा देण्यात आला.
उद्योजक सुहेल सेठ यांनी हा किस्सा सांगितला आहे. त्यानुसार, 6 फेब्रुवारी 2018 रोजी प्रिंस चार्ल्स यांना रतन टाटा यांना किताब द्यायचा होता. त्यासाठी टाटा यांना बकिंघम पॅलेस पॅलेसमध्ये बोलविण्यात आले. पण त्याच वेळी त्यांचे दोन लाडके कुत्रे टँगो आणि टिटो यांच्यापैकी एकाचा तब्येत नाजूक झाली. त्यामुळे रतन टाटा यांच्या मनाची घालमेल झाली. पण शेवटी, काळजीपोटी ते हा अवॉर्ड घ्यायाला जाऊ शकले नाही. कुत्र्यावरील प्रेमापोटी, काळजीपोटी त्यांनी हा निर्णय घेतला.
रतन टाटा यांचे नाव तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. आपल्या संपत्तीतील मोठ हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. 1919 मध्ये टाटा ट्रस्टची (Tata Trust) स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये दान करण्यात आले. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते.
भटक्या कुत्र्यांसाठी केले होते आवाहन
रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत एका संवेदनशील विषयाला हात घातला. आपण प्राणीमात्रांविषयी सजग राहावे, या हेतूने त्यांनी ट्विट केले. मुक्या प्राण्याविषयी आपली एक छोटी कृती त्यांना गंभीर इजेपासूनच वाचवणार नाही, तर त्यांचे प्राण पण वाचवू शकेल. प्रत्येकाने वाहन चालविण्यापूर्वी त्यांच्या चारचाकी खाली एखादा प्राणी तर नाही ना, याची खातरजमा करण्याचे आवाहन रतन टाटा यांनी केले होते.
8 फेब्रुवारी 2007 रोजी रतन टाटा यांच्या नावे एक रेकॉर्ड झाला. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी बंगळुरुच्या एअरशोमध्ये मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट F-16 उडवले. या जेट फायटरचे वैमानिक पॉल हॅटेनडॉर्फ होते. रतन टाटा यांनी जे एअरक्राफ्ट उडवले होते, ते अमेरिकन नौसेनेचे विमान होते. त्याचे नाव फायटिंग फॅल्कन होते. भारताच्या रिअल लाईफ हिरोने हे फायटर प्लेन उडवले होते.