रतन टाटा हे त्यांच्या मृदू आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जातात. टाटांवर आणि त्यांच्या ब्रँडवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. रतन टाटा हे तर कर्मचाऱ्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या उद्दात स्वभाव, दानशूरतेची उदाहरणे कमी नाहीत. त्यात अजून एक भर पडली आहे. सध्या काही कंपन्या पैसा वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. त्यात बड्या ब्रँड्चा पण समावेश आहे. पण रतन टाटा यांनी कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवली आहे. त्यांना कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण टाटा यांनी त्यांची मनं जिंकून घेतली.
काय आहे प्रकरण
रतन टाटा हे भलेही श्रीमंतांच्या यादीत सामील नाहीत. पण कर्मचाऱ्यांसाठी ते दिलदार असल्याचे समोर आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सांयसेज ( TISS) कर्मचाऱ्यांवर अचानक मोठे संकट कोसळले. निधी नसल्याने 28 जून रोजी 115 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे जाहीर करण्यात आले. 55 फॅकल्टी सदस्य आणि 60 इतर कर्मचाऱ्यांवरील नोकरीचे संकट गडद झाले. पण 30 जून रोजी त्यांच्या नोकर कपातीला अचानक ब्रेक लावण्यात आला.
रतन टाटा आले मदतीला धावून
कर्मचारी कपात रोखण्यासाठी रतन टाटा धावून आले. त्यांच्या नेतृत्वातील टाटा एज्युकेसन ट्रस्टने (TET) टीआयएसएसचे अनुदान वाढविण्याचा तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यावर लागलीच अंमलबजावणी झाली. त्यामुळे 115 कर्मचाऱ्यांची नोकरी वाचली. या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले निलंबनाचे पत्र मागे घेण्यात आले. टाटा ट्रस्टने TISS चे प्रकल्प, कार्यक्रम आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि अन्य खर्चांसाठी निधीची पुर्तता केली. या फंडमुळे 115 कर्मचाऱ्यांची नोकरी वाचली.
88 वर्षे जुनी संस्था आर्थिक संकटात
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेजची (TISS) सुरुवात वर्ष 1936 मध्ये करण्यात आली. सर दोराबजी टाटा यांनी यांनी या संस्थेचे नाव टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असे ठेवले होते. मग 1944 मध्ये संस्थेचे नाव बदलून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सांयसेज असे करण्यात आले. 1964 मध्ये या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा मिळाला. टाटा यांच्या या संस्थेत मानव अधिकार, सामाजिक न्याय आणि विकास अभ्यास यामधील शिक्षण देण्यात आले.