Mukesh Ambani | रतन टाटा पिछाडीवर, मुकेश अंबानी यांनी कमाईत अशी घेतली आघाडी

| Updated on: Jan 14, 2024 | 2:29 PM

Mukesh Ambani | गेल्या आठवड्यात मुंबई स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक 542.3 अंकानी वा 0.75 टक्क्यांनी उसळला. बेंचमार्क इक्विटी सूचकांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी 1 टक्क्यांहून अधिकने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या मार्केट कॅपमध्ये यंदा एकदम वाढ झाली.

Mukesh Ambani | रतन टाटा पिछाडीवर, मुकेश अंबानी यांनी कमाईत अशी घेतली आघाडी
Follow us on

नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : या वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने नवीन रेकॉर्ड केला. कमाईत रतन टाटा यांच्या टीसीएस कंपनीला पिछाडीवर टाकले. 5 व्यापारी सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली. हा शेअर रेकॉर्ड उच्चांकावर पोहचला. देशातील सर्वात मोठ्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 90 हजार कोटी रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली. कंपनीचे मार्केट कॅप 18.50 लाख कोटी रुपयांवर पोहचले.

TCS ची पण आघाडी

दुसरीकडे टीसीएसच्या शेअरमध्ये पण तेजी दिसून आली. कंपनीचे मार्केट कॅपमध्ये 50 हजार कोटी रुपयांहून अधिकची तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात देशातील 10 टॉप कंपन्यांमधील 5 कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली. त्यांचे मार्केट कॅप 1,99,111.06 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवलात सर्वाधिक वाढ दिसून आली. तर एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, भारतीय स्टेट बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांना एकूण 76,098.67 कोटी रुपयांचा झटका लागला.

हे सुद्धा वाचा

या कंपन्यांना झाला फायदा

  1. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये 90,220.4 कोटी जमा झाले. कंपनीचे मूल्य वाढून 18,53,865.17 कोटी रुपयांवर पोहचले.
  2. टीसीएसच्या भांडवलात 52,672.04 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. कंपनीचे मार्केट कॅप 14,20,333.97 कोटी रुपये झाले. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेजचा शेअर शुक्रवारी जवळपास 4 टक्क्यांनी वधारला. कंपनीने डिसेंबर महिन्यात महसूलात निव्वळ 8.2 टक्क्यांच्या वाढीसह 11,735 कोटी रुपयांची वृद्धी दिसून आली.
  3. इन्फोसिस चे मार्केट कॅप 32,913.04 कोटी रुपयांनी वाढून र 6,69,135.15 कोटी रुपयांवर पोहचले. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत कमाईत अंदाजाप्रमाणे जोरदार कामगिरी बजावली. इन्फोसिसच्या शेअरमध्ये 8 टक्के उसळी आली.
  4. भारती एअरटेलचे मूल्यांकन 16,452.93 कोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे कंपनीचे बाजारातील भांडवल
    6,05,299.02 कोटी रुपये झाले.
  5. आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 6,852.65 कोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे एकूण बाजार भांडवल 7,04,210.07 कोटी रुपये झाले.

या कंपन्यांना बसला फटका

  1. एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 32,609.73 कोटी रुपयांनी घसरले. त्यामुळे बाजारातील भांडवल घसरुन 12,44,825.83 कोटी रुपयांवर आले.
  2. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य 17,633.68 कोटींनी घसरले. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 5,98,029.72 कोटी रुपये झाले.
  3. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे एमकॅप 9,519.13 कोटींनी घसरुन 5,24,563.68 कोटी रुपयांवर आले.
  4. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आयटीसीचे मार्केट कॅप 9,107.19 कोटी रुपयांनी घसरुन 5,82,111.90 कोटी रुपये झाले.
  5. देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेचे मूल्य 7,228.94 कोटी रुपयांनी घसरले आणि 5,65,597.28 कोटी रुपयांवर आले.