नवी दिल्ली: चेकचा वापर करुन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबरपासून बँकांच्या सर्व शाखांमध्ये सीटीएस (Cheque Truncation System) सिस्टीम सुरु होणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्येचं सीटीएस पद्धती चेक वटवण्यासाठी वापरली जाते. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर वित्तीय धोरण सादर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत. (RBI announced that all banks to have cheque truncation system by September 2021)
आरबीआयनं भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरु केली होती. सध्या काही शहरांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे. सप्टेंबर 2021 पासून देशातील बँकांच्या सर्व शांखांमध्ये ही सुविधा सुरु होईल. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. ही प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. याअंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक वटवला जाणार आहे.
चेकनं व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावं लागत असे. मात्र, सीटीएस पद्धत सुरु झाल्यानंतर चेक वटवणं सोपं झालं आहे. सीटीएस प्रणालीमुळे चेक क्लिअरिंग सोपं आणि जलद झालं आहे. सीटीएस पद्धतीत चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जावं लागत नाही. चेक ऐवजी त्याचं इलेक्ट्रोनिक प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवली जाते. त्या बँकेकडून मंजुरी आल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. यामध्ये चेक फाटणे किंवा खराब होणे, अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाहीत.
रेपो रेट 4 टक्के
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं द्विमासिक वित्तीय धोरणाची समीक्षा केली. त्याअनुषंगानं रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्के ठेवण्यात आला तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के ठेवण्यात आला.
रेपो दर म्हणजे काय?
आरबीआय ज्या दरातनं व्यापारी बँकांना एका दिवसासाठी कर्ज देते तो दर होय. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ज्या दरानं बँका त्यांचा पैसा आरबीआयकडे ठेवतात तो दर होय.
गाडी चालवताना ‘हे’ 6 नियम तोडल्यास तुमचं लायसन्स जप्त होणार!#TrafficRules | #TrafficAlert | #DrivingRules | #drivinglicence https://t.co/XU71DCer6T
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2021
संबंधित बातम्या:
UPI Payment | एका दिवसांत UPIमधून किती पैसे करू शकता ट्रान्सफर? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी…
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ
(RBI announced that all banks to have cheque truncation system by September 2021)