मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णभांडारात सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी भर पडल्याची माहिती समोर आली आहे. आरबीआयच्या (RBI) माहितीनुसार, विदेशी चलन मालमत्तेत (FCA) आणि सोन्याच्या साठ्यात (Gold Reserve) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. त्यानुसार RBI कडील सोन्याच्या साठ्यात आठवडाभरात आठ कोटी डॉलर्सची भर पडली. त्यामुळे आरबीआयकडील सोन्याच्या साठ्याचे एकूण मूल्य 34.63 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे. (RBI Foregin currency e and gold reserve jumps to record break level)
गेल्या आठवड्यात 19 मार्चला नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू आठवड्यात RBI कडील सोन्याच्या साठ्यात 23.3 कोटी डॉलर्सची भर पडून हा साठा 582.271 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला. त्यापूर्वीच्या आठवड्यात या साठ्यात 1.74 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) ट्विटर ‘फॉलोअर्स’ची संख्या दिवसागणिक वाढत असून, आता ती संख्या 10 लाखांवर गेली आहे. रिझर्व्ह बँक अशी कामगिरी करणारी जगातील पहिली मध्यवर्ती बँक बनली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटवर रिझर्व्ह बँकेने 10 लाख फॉलोअर्ससह अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) आणि युरोपियन सेंट्रल बँकेला (European Central Bank) मागे टाकले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, 27 सप्टेंबर 2020 रोजी त्याचे फॉलोअर्स 9.66 लाख होते, ते फॉलोअर्स 10 लाखांवर गेले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंतर 7,74,000 फॉलोअर्ससह दुसर्या क्रमांकावर बँको डी मेक्सिको (बँक ऑफ मेक्सिको) आहे. जगातील सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे ट्विटरवर फक्त 6.67 लाख फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या फॉलोअर्सची संख्या 5.91 लाख आहे.
संबंधित बातम्या:
Gold Prices Today: सोनं खरेदी करायचं असेल तर लगेच करा; होळीनंतर दर चार हजारांनी वधारणार?
ट्विटरवर RBI सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बँक, नेमकं कारण काय?
20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची घोषणा
(RBI Foregin currency e and gold reserve jumps to record break level)