Shakatikant Das On Upi | सध्याचा जमाना हा डिजीटलचा आहे. हल्ली सर्रासपणे व्यवहारासाठी यूपीआय app चा वापर केला जातो. नोटाबंदीपासून यूपीआयच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यूपीआयवर वेळोवेळी कॅशबॅक आणि विविध ऑफर्स मिळतात, त्यामुळे अनेक जण ऑनलाईन पेमेंट पद्धतीकडे वळले आहेत. तसेच यूपीआयमुळे सुट्टया पैशांची कटकटही नाहीशी झालीय. सोबत कॅशही ठेवावी लागत नाही. यामुळे यूपीआयकडे लोकांचा वाढता कळ आहे. यूपीआय वापरणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठी अपडेट दिली आहे.
यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहाराबाबत शक्तिकांत दास यांनी अपडेट दिलीय. “यूपीआय व्यवहारात वर्षभरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूपीआय वापरणाऱ्यांचा आकडा हा 36 कोटींच्या पार गेला आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत यूपीआय वापरणाऱ्यांची संख्या ही 24 कोटी इतकी होती. मूल्याच्या दृष्टीने हा व्यवहार 6 कोटी 27 लाख कोटी रुपयांचा असल्याचं”, शक्तिकांत दास यांनी सांगितलं. आरबीआयच्या मु्ख्य कार्यालयात डिजीटल पेमेंट जागरूकता सप्ताह अर्थात (digital payment awareness week) सुरुवात झाली. या निमित्ताने शक्तिकांत दास बोलत होते.
फेब्रुवारी 2022 मध्ये 5 कोटी 36 लाख रुपयांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत हा आकडा 17 टक्क्यांनी अधिक आहे. मासिक डिजीटल व्यवहार गेल्या 3 महिन्यांपासून दरवेळा 1 हजार कोटींचा आकडा पार जात आहे. “यूपीआय आणि सिंगापूच्या पे नाऊ यांच्यात करार झालाय. तेव्हापासून अन्य देशांनीही व्यवहारासाठी असाच करार करण्यासाठी इच्छा व्यक्त केलीय”, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
“हा करार किमान 6 देशांमध्ये होईल. यूपीआय-पेनाऊ कराराला 10 दिवस झाले आहेत. या दरम्यान सिंगापूर इथून 120 तर सिंगापूरला पैसे पाठवण्यासाठी 22 व्यवहार करण्यात आले आहेत”, असंही शक्तिंकात दास यांनी स्पष्ट केलं.