Home Loan | गृहकर्ज घेणाऱ्यांना आरबीआयचा दिलासा, या निर्णयाने बॅंकांना बसणार चाप

| Updated on: Sep 14, 2023 | 6:34 PM

घरासाठी कर्ज घेणाऱ्यांना ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने दिलासा दिला आहे. पाहा नेमका काय निर्णय आरबीआयने घेतला आहे.

Home Loan | गृहकर्ज घेणाऱ्यांना आरबीआयचा दिलासा, या निर्णयाने बॅंकांना बसणार चाप
rbi
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( RBI ) होम लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही जर घरासाठी कर्ज घेतले आहे. आणि कर्जाची सर्व रक्कम व्याजासह चुकती केली असेल तर तुम्हाला तुमच्या घराची कागदपत्रे ( property documents ) वेळीच देणे बॅंकांना बंधनकारक आहे. जर बॅंका या कामात दीरंगाई करीत असतील त्यांना दंड आकारण्यात येईल असे आदेश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी हे आदेश काढले आहेत. या आदेशाने होम लोन काढणाऱ्यांना ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

ग्राहकांनी बॅंकेतून घेतलेले गृहकर्ज चुकते केल्यानंतर 30 दिवसांनंतर बॅंकांनी ग्राहकांना त्यांचे कागदपत्रे परत करणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीयाचे हे आदेश सर्व बॅंका, गैर-बॅंकिंग कंपन्या ( एनबीएफसी ) आणि परिसंपत्ती पुनर्निर्माण कंपन्यांना ( Asset Reconstruction companies ) यांना लागू आहेत. बॅंका आणि वित्तीय संस्थांनी कोणत्याही प्रकारचा चार्जही त्यासाठी आकारु नये असे आरबीआयने म्हटले आहे. लोन घेणारे आपल्या बॅंक ब्रॅंचमधून वा वित्तीय संस्थेच्या कोणत्याही शाखेतून आपल्या सवडीनूसार कागदपत्रे प्राप्त करू शकतात. बॅंकांनी जारी केलेल्या सेक्शन लेटर ( ऋृण स्वीकृती पत्र ) मध्ये मूळ चल/ अचल संपत्ती दस्ताऐवज परत करण्याची कालावधी आणि जेथून ते परत मिळतील त्या ठिकाणाचा उल्लेखही असायला हवा असे आरबीआयने म्हटले आहे.

नेमके काय आदेश आहेत

जर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या उत्तराधिकाऱ्यास कागदपत्रे द्यायला हवीत. आरबीआयच्या निर्देशानूसार याची जबाबदारी रेगुलेटेड एंटीटीजची असेल. तसेच या प्रक्रियेची माहीती ऑनलाईन वेबसाईटवरही अपलोड करावी लागेल. जर बॅंका किंवा अन्य रेग्युलेटेड एंटीटीजनी रजिस्ट्रीची कागदपत्रे किंवा मुळ कागदपत्रे हरविली. तर ग्राहकांना पुन्हा कागदपत्रे तयार करण्यासाठी बॅंकांनी मदत करावी. बॅंकांनी ग्राहकांचे  मुळ चल आणि अचल संपत्तीचे दस्ताऐवज कर्ज चुकल्याच्या 30 दिवसानंतरही परत केले नाही तर  बॅंकांनी ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी असे आदेश आरबीआयने दिले आहेत.

खर्चही द्यावा लागेल

ग्राहकांना उशीराने कागदपत्रे दिल्यास दर दिवसाला पाच हजार रुपये या प्रमाणे ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यास बॅंका बांधील असतील. जर बॅंकांकडून ग्राहकांनी कर्ज घेताना तारण ठेवलेली मुळ कागदपत्रे गहाळ केल्यास बॅंकांनी त्यांना डुप्लिकेट कागदपत्रे काढण्यास मदत तर करावीच शिवाय त्यासाठी आलेल्या खर्चही द्यावा असे आदेश आरबीआयने दिला आहे.