नवी दिल्ली : मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या खाजगी (Yes Bank Withdrawal Limit) क्षेत्रातील येस बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 दिवसांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. आरबीआयच्या या स्थगितीनंतर खातेदार त्यांच्या खात्यातून 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. आरबीआयने सरकारशी याबाबत चर्चा केल्यानंतर बँकेच्या निदेशक मंडळाच्या क्षमतेच्या पुढे जात 30 दिवसांसाठी हा निर्णय घेतला आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आज सायंकाळी (5 मार्च) 6 वाजल्यापासून (Yes Bank Withdrawal Limit) ही स्थगिती लागू करण्यात आली आहे. येत्या 3 एप्रिलपर्यंत ही स्थगिती लागू राहिल.
Reserve Bank of India (RBI) puts Yes Bank under moratorium. Withdrawals have been capped at Rs 50,000. pic.twitter.com/RidOCV2Rmp
— ANI (@ANI) March 5, 2020
SBI च्या माजी अधिकाऱ्याकडे YES बँकेची सूत्र
बँकेच्या वाईट आर्थिक परिस्थितीला पाहता RBI ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, SBI चे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना YES बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
माहितीनुसार, या स्थगितीदरनम्या कुठल्याही खाते दारकाला त्याच्या कुठल्याही बचत, चालू किंवा इतर कुठल्याही खात्यातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही. जरी या बँकेत एका खातेदारकाचे एकापेक्षा जास्त खाते असेल. तरी बँकेतून एकूण 50 हजाराची रक्कमच काढू शकतो, अशी माहिती आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला
YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती वाईट झाली. भारतीय स्टेट बँक आणि इतर आर्थिक संस्था YES बँकेला या संकटातून बाहेर काढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी (5 मार्च) दिली. एसबीआयला यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.
RBI चे पीएमसी बँकेवर निर्बंध
काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनियमिततेपोटी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. सुरुवातीला ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. हे 10 हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता.
पण 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील. मात्र, तरिही दैनंदिन खर्च, आजार, शिक्षण आणि इतर गोष्टींवरील खर्चासाठी ही रक्कम तोकडी असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. यानंतर 26 सप्टेंबरला ही मर्यादा वाढवून 10 हजार करण्यात आली. तसेच 3 ऑक्टोबरला या मर्यादेत वाढ करुन ती 25 हजार केली होती.