आता 200 रूपयांच्या नोटेवर वक्रदृष्टी; बाजारातून 137 कोटींच्या नोटा हटवल्या, कारण तरी काय?

| Updated on: Oct 08, 2024 | 4:12 PM

RBI Remove 200 Rupees note : रिझर्व्ह बँकेने बाजारातील 200 रुपयांच्या नोटा, ज्यांचे मूल्य जवळपास 137 कोटी रुपये आहे, माघारी बोलावल्या आहेत. काही 500 रुपायांच्या नोटा पण माघारी बोलावण्यात आल्या आहेत. 2016 मध्ये केंद्र सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर या नोटांना महत्व आले होते.

आता 200 रूपयांच्या नोटेवर वक्रदृष्टी; बाजारातून 137 कोटींच्या नोटा हटवल्या, कारण तरी काय?
200 रुपयांच्या नोटा माघारी
Follow us on

रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या. आताच आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा परत बोलावल्या होत्या, त्यानंतर आता 200 रुपयांच्या नोटा माघारी बोलावण्यात आल्या आहेत. जवळपास 137 कोटी रुपये मुल्याच्या नोटा परत बोलावण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई गेल्या 6 महिन्यात पूर्ण केली आहे. त्यामुळे 200 रुपयांच्या नोटेवर हे संकट का ओढावले याचे कोडे नागरिकांना पडले आहे.

नोटा झाल्या खराब

रिझर्व्ह बँक 200 रुपयांच्या नोटा बंद करणार असे तुम्हाला वाटत असेल तर असे अजिबात नाही. बाजारातून या नोटा परत बोलवण्यामागे काही खास कारण आहे. या नोटा जीर्ण, खराब आणि मळकटलेल्या असल्याने त्यांना परत बोलावण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने 137 कोटी रुपये मूल्यांच्या या नोटा परत बोलावल्या आहेत. या नोटांवर लिहिण्यात आले आहे. तर काही नोटा खराब झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी 135 कोटी रुपयांच्या नोटा बाद

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी 135 कोटी मूल्यांच्या 200 रुपयांच्या नोटा चलनाच्या बाहेर केल्या होत्या. या नोटा खराब झालेल्या होत्या. फाटलेल्या आणि अत्यंत जीर्ण झालेल्या होत्या. विशेष म्हणजे 200 रुपयांची नोट बाजारात येऊन जास्त वर्ष झाले होते. त्यामुळे त्या बाद करण्यात आल्या. खरंतर 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक खराब झाल्या होत्या. बँकिंग तज्ज्ञांच्या मते, 2000 रुपयांची नोट बंद झाल्यानंतर बाजारात 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा वापर वाढला आहे. त्यामुळेच 200 रुपयांच्या नोटांची खराब होण्याची संख्या वाढली आहे.

500 रुपयांच्या नोटा पण माघारी

रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार, 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक खराब आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या चलनात जवळपास 633 कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारातून परत बोलवण्यात आल्या आहेत. या नोटा जीर्ण झाल्या होत्या. त्यातील काही फाटल्या होत्या. तर काही नोटांवर लिहिण्यात आले होते. त्यामुळे त्या माघारी बोलावण्यात आल्या. चालू आर्थिक वर्षाच्या सहामाहीत खराब नोटांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 नोटांची संख्‍या 50 टक्के तर 200 रुपयांच्या नोटांची संख्या 110 टक्के इतकी होती.