RBI चा वित्तसंस्थांना दट्ट्या, आता या बॅंकांमधून 20,000 रुपयांपेक्षा जादा कॅश लोन मिळणार नाही

| Updated on: May 08, 2024 | 10:04 PM

नॉन बॅंकींग फायनान्सियल कंपन्यांना आता त्यांच्या ग्राहकांना 20 हजाराहून अधिक रक्कम कॅश लोन म्हणून देता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने हे निर्देश दिले आहेत.

RBI चा वित्तसंस्थांना दट्ट्या, आता या बॅंकांमधून 20,000 रुपयांपेक्षा जादा कॅश लोन मिळणार नाही
rbi news
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ( RBI ) बिगर-बॅंकींग वित्तीय कंपन्यांसाठी ( NBFC ) कर्ज वाटपासंदर्भात कठोर निर्देश जारी केले आहेत. आरबीआयने दिलेल्या आदेशानूसार आता कोणत्याही एनबीएफसी कंपन्यांच्या ग्राहकांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश लोन मिळणार नाही. आयकर अधिनियम, 1961 च्या नियम 269 SS अंतर्गत कोणत्याही ग्राहकाला आता 20 हजार रुपयांपेक्षा जादा कॅश अमाऊंट लोन म्हणून मिळणार नसल्याने आता ग्राहकांची अडचण होणार आहे.

एनबीएफसी ( Non Banking Financial Company ) कंपन्या धोक्यात येऊ नयेत. त्यांना जोखमीचा सामना करावा लागू नये आणि नियमांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आरबीआयला आता हा नियम अधिक कडक करायचा आहे, असे या अहवालात म्हटले आहे. आयआयएफएल फायनान्स या एनबीएफसी कंपनीवर अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत असताना आरबीआयने हे निर्देश जारी केले आहेत. या अहवालात काही कंपन्यांनी कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रोखीने कर्जे दिली आणि जमा केल्याचे वृत्त आहे.

आरबीआयने नॉन बॅंकींग फायनान्सिएल कंपन्यांना 20 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम रोख स्वरूपात देऊ नये असे पत्र लिहून कळविले आहे आणि नियमानुसार कोणत्याही ग्राहकाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रोखीने कर्ज देता येणार नाही असे म्हटले आहे. आता या स्थितीत कोणत्याही एनबीएफसी कंपनीला 20,000 रुपयांपेक्षा जादा कॅश लोन देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

काय आहेत नेमके निर्देश

गेल्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँकेने अनेक नॉन बॅंकींग फायनान्सियल कंपन्यांवर ( NBFC ) कारवाई केली आहे. या नॉन बॅंकींग फायनान्सियल कंपन्यांनी आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत वारेमाप कर्ज वाटप केले होते. त्यामुळे रोखीने कर्ज देण्याच्या नियमाचेही उल्लंघन झाले होते. अशा परिस्थितीत आरबीआयने एनबीएफसी कंपन्यांना नियमांची आठवण करून देत अशा सूचना जारी केल्या आहेत त्यामुळे रोख कर्जवाटपात अटी आणि नियमांचे पालन करता येणार आहे.

सोने कर्ज वाटप थांबविण्याचे आदेश

आरबीआयने कर्ज व्यवस्थापनातील मोठ्या त्रुटींमुळे IIFL ( India Infoline Finance Limited ) फायनान्सला नवीन ग्राहकांसाठी त्यांचे सोने कर्ज वाटप व्यवहार तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. IIFL फायनान्सचा गोल्ड लोन ऑपरेशन्सचा त्याच्या व्यवसायात मोठा वाटा आहे, त्यांच्या एकूण उत्पन्नात गोल्ड लोन ऑपरेशन्स हा व्यवसायाच्या एक तृतीयांश इतका वाटा आहे. फायनान्स कंपनीने कंपनीवर सोन्याची शुद्धता आणि वजनाची अपुरी चाचणी, रोखीने जादा कर्ज देणे, मानक लिलाव प्रक्रियेचे पालन न करणे आणि कस्टमर अकाऊंट चार्जेसमध्ये अपारदर्शकता असणे आदी त्रूटी दाखविल्या आहेत.