Rekha Jhunjhunwala : अगोदर चौपट केला पैसा; आता हा शेअर झाला रॉकेट, तज्ज्ञ म्हणाले लावा बोली

| Updated on: May 17, 2024 | 9:59 AM

Multibagger Stock : अनेक गुंतवणूकदारांची रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर बारीक नजर असते. त्यांच्या पोर्टफोलिओतील एका शेअरने उत्तुंग भरारी घेतली आहे. या स्टॉकने यापूर्वी चौपट परतावा दिला होता. आता हा स्टॉक पुन्हा धावला आहे.

Rekha Jhunjhunwala : अगोदर चौपट केला पैसा; आता हा शेअर झाला रॉकेट, तज्ज्ञ म्हणाले लावा बोली
या शेअरने रेखा झुनझुनवाला यांना मोठा फायदा
Follow us on

रेखा झुनझुनावाला यांच्या पोर्टफोलिओतील कंपनी NCC ने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. 13 मे 2022 रोजी एनसीसीचा शेअर 62.1 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. तो आज 273 रुपये प्रति शेअरवर पोहचला आहे. या कालावधीत NCC कंपनीच्या शेअरने 339 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तर हा स्टॉक BSE 500 Index या कालावधीत केवळ 51.69 टक्क्यांनी उसळला आहे.

NCC चा चढता आलेख

काही दिवसांपूर्वी NCC चा शेअर BSE वर 251.05 रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर त्याने 8 टक्क्यांची उसळी घेतली. हा शेअर 272.95 रुपये प्रति शेअरवर पोहचला. 5 एप्रिल 2024 रोजी या शेअरने उच्चांकी 277.90 प्रति शेअरची भरारी घेतली. NCC चा शेअर 20-दिवस, 30-दिवस,50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक घौडदौड करत आहे.

हे सुद्धा वाचा

1 वर्षांत मालामाल

NCC चा शेअरने एका वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात 140 टक्के रिटर्न दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या शेअरने 62 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 16,989 कोटी रुपये आहे. कंपनीने एकूण 9.94 लाख शेअरने बीएसईवर 26.53 कोटी रुपयांचा व्यापार केला आहे. या कंपनीचा RSI 53.6 वर आहे. हा शेअर ओव्हरबॉट अथवा ओव्हरसोल्ड नाही. या शेअरमध्ये जोरदार तेजीचे सत्र आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत या शेअरने जोरदार कमाई केली.

कंपनीला जोरदार फायदा

NCC कंपनीने बुधवारी तिमाही निकाल जाहीर केले. या आकडेवारीनुसार, एनसीसीने वार्षिक आधारावर चौथ्या तिमाहीत 25 टक्के निव्वळ नफा नोंदवला आहे. आतापर्यंत कंपनीला 239.2 कोटींचा नफा झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत एकूण नफा 191 कोटी रुपये झाला होता. या आर्थिक वर्षांतील चौथ्या तिमाहीत EBITDA 18.5 टक्क्यांहून वाढून 550.4 कोटी रुपयांवर पोहचला. गेल्या वर्षी तो समान कालावधीत 464.6 कोटी रुपये होता.

रेखा झुनझुनवाला यांचा वाटा किती

नुवामा, ब्रोकर्सने हा शेअर 290 रुपयांचे लक्ष्य गाठेल, असा अंदाज वर्तविला आहे. कंपनीची घौडदौड आणि नफ्याचे गणित पाहाता, ब्रोकरेज हाऊसने हा अंदाज वर्तविला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीची 10.64 टक्के म्हणजे 6.67 कोटींचे शेअर आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका