PK Google : भारताच्या या उद्योगपतीची पाकिस्तानमध्ये तुफान क्रेझ; Google मध्ये सर्वाधिक वेळा नाव सर्च, कारण तरी काय?

| Updated on: Dec 21, 2024 | 5:24 PM

Reliance Mukesh Ambani : पाकिस्तानच्या गुगल सर्चच्या यादीत मुकेश अंबानी सध्या सर्वात आघाडीवर आहेत. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची संपत्ती किती? त्यांचे घर कुठे आहे, त्यांच्या कंपन्यांचा टर्नओव्हर किती? असे अनेक गोष्टींची माहिती उत्सुकतेने सर्च करण्यात येत आहे.

PK Google : भारताच्या या उद्योगपतीची पाकिस्तानमध्ये तुफान क्रेझ; Google मध्ये सर्वाधिक वेळा नाव सर्च, कारण तरी काय?
मुकेश अंबानी
Follow us on

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे देशातच नाही परदेशात पण लोकप्रिय आहेत. त्यांची क्रेझ पाकिस्तानमध्ये सुद्धा दिसून येत आहे. शेजारील पाकिस्तानमध्ये गुगल बाबावर लोक मुकेश अंबानी यांच्याविषयीची इंत्यभूत माहिती जमा करत आहेत. पाकिस्तानच्या गुगल सर्च यादीत मुकेश अंबानी हे सर्वात आघाडीवर आहेत. गुगलने 2024 मधील पाकिस्तानचा सर्च डाटा प्रसिद्ध केला आहे. त्यात पाकिस्तानमधील जनतेने त्यांचे नाव सर्वाधिक वेळा सर्च केल्याचे समोर आले आहे.

मुकेश अंबानी यांच्याविषयी काय काय घेतली महिती?

पाकिस्तानच्या गुगलवर सर्च करण्यात येणाऱ्या यादीत मुकेश अंबानी हे सर्वात आघाडीवर आहेत. सर्च आशियामध्ये त्यांची एकूण संपत्ती किती? त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे. ते कुठे राहतात. त्यांचा आलिशान बंगला कसा आहे. त्यांच्या कंपन्या किती याचा शोध घेण्यात आला आहे. त्यात मुकेश अंबानी यांच्या एकूण सपंत्तीविषयी सर्वाधिक वेळा माहिती घेण्यात आल्याचे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

गुगल सर्च यादीत इतर माहितीमध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा कोण, त्याचे नाव काय, तर मुकेश अंबानी यांची मुलगी कोण आहे, तिची कंपनी कोणती, तिची संपत्ती किती? रिलायन्स इंडस्ट्रीजची उत्पादनं आणि कंपन्या कोणत्या याची माहिती गोळ करण्यात आल्याचे गुगलच्या यादीवरून दिसून येते.

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष

फोर्ब्सच्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची एकूण संपत्ती ही 94.3 अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानी 120 अब्ज डॉलरचा महसूल असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी चालवतात. आरआयएल पेट्रोकेमिकल्स, टेलीकॉम, ऑईल अँड गँस, मीडिया, आर्थिक सेवा आणि रिटेल सह विविध उद्योग-व्यवसायात हा उद्योग समूह आहे.

मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात कोण कोण?

मुकेश अंबानी यांचे लग्न नीता अंबानी यांच्याशी झाले आहे. मुकेश अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश आणि ईशा अंबानी ही जुळं भावडं आहेत. तर अनंत अंबानी हा सर्वात लहान भाऊ आहे. मुकेश अंबानी यांचे तीनही मुलं हे रिलायन्सच्या संचालक मंडळात आहेत. आकाश अंबानी हा जिओचा प्रमुख आहे. तर ईशा रिटेल आणि आर्थिक सेवांची प्रमुख आहे. तर लहान मुलगा अनंत अंबानी याच्याकडे ऊर्जा व्यवसाय देण्यात आला आहे.