रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या या कंपनीने 2016 मध्ये दूरसंचार क्षेत्रात मोठा भूकंप घडवला होता. लवकरच ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. या कंपनीत 13 परदेशी कंपन्यांची हिस्सेदारी आहे. 2020 मध्ये अंबानी यांनी हा वाटा दिला होता. 57 ते 64 अब्ज डॉलरमध्ये ही विक्री झाली होती. या कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.
संचालक मंडळाचा हिरवा कंदिल
हिंदू बिझनेसलाईनने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, रिलायन्स समूहातील संचालक मंडळ रिलायन्स जिओचा आयपीओ आणण्यासंदर्भात अनुकूल आहे. टेलिकॉम क्षेत्रात या कंपनीने धाक जमावला आहे. कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग आहे. त्यामुळे आता बाजारात उतरण्यास हरकत नसल्याने संचालक मंडळाने या प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अर्थात ही प्राथमिक चर्चा आहे. बाजारातील तज्ज्ञांनुसार, रिलायन्स जिओचा आयपीओची किंमत 1200 रुपये असू शकते. विश्लेषकांच्या मते, रिलायन्स जिओचे मूल्यांकन 82 ते 94 अब्ज डॉलर इतके आहे. मोबाईल टेरिफमध्ये वाढ झाल्याने हा आकडा वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. देशात मोबाईल टेरिफमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कोणाचा किती वाटा?