Petrol Diesel Price Today : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या भावात 307 व्या दिवशी पण दिलासा कायम आहे. आज देशात सर्वात महागडे इंधन राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये तर सर्वात स्वस्त इंधन पोर्ट ब्लेअरमध्ये मिळत आहे. भाव तुम्हाला एका SMS वर तपासता येईल.
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol-Diesel Price) 307 व्या दिवशी पण दिलासा कायम आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी नवीन इंधन दर जाहीर केले. कच्चा तेलाचे बाव आज 75 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. देशात सर्वात महागडे इंधन राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये मिळत आहे. या ठिकाणी पेट्रोलचा भाव 113.28 आणि डिझेलचा दर 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात स्वस्त इंधन पोर्ट ब्लेअर येथे मिळत आहे. याठिकाणी पेट्रोल 84.1 रुपया तर डिझेल 79.74 रुपये मिळत आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलचा (WTI Crude Oil) भाव 69.38 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) आजचा भाव 75.33 डॉलर प्रति बॅरल आहे.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.