मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियानं (RBI)काल म्हणजेच गुरुवारी वार्षिक रिपोर्ट सादर केला. ह्या रिपोर्टमध्ये आरबीआयनं कोणते नाणे आणि नोटा (CURRENCY AND COINS)किती चलनात आहेत याची माहिती दिली आहे. एवढच नाही तर किती नोटा आणि नाणे जारी केले जातात तेही आरबीआयनं सांगितलं. विशेष म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली नसल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसापासून दोन हजार रुपयाची नोट बंद केल्याची अफवा उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर आरबीआयचं हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. (Reserve bank of india annual report about Coins in circulation)
आरबीआय रिपोर्टनुसार, रिझर्व बँक Rs2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 हजाराच्या नोटा जारी करते. देशात अनेक ठिकाणी1 रुपयाचं नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नाही. काही ठिकाणी तर 10 रुपयाचं नाणही घेतलं जात नाही. 50 पैशाच्या नाण्याची तर अवस्थाच विचारु नये. ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.
बाजारात कोणत्या मुल्याच्या किती नोटा आहेत याची माहितीही रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. जेवढ्या नोटा बाजारात आहेत, त्यापैकी 85.7 टक्के नोटा ह्या 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत. 31 मार्च 2020 पर्यंत ही टक्केवारी 83.4 टक्के एवढी होती. बाजारात सर्वाधिक नोटांची संख्या ही 500 रुपयांच्या चलनाची आहे. एकूण चलनाच्या 31.1 टक्के एवढ्या पाचशेच्या नोटा बाजारात आहेत. त्यानंतर सर्वाधिक नोटा ह्या 10 रुपयांच्या आहेत, त्यांची एकूण चलनातली टक्केवारी ही 23.6 टक्के एवढी आहे. 31 मार्चपर्यंतच्या चलनाची ही माहिती आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी नोटांच्या आवकमध्ये 9.7 टक्क्याएवढी घट झाली आहे. 1 जुलै ते 31 मार्च 2021 पर्यंत नोटांच्या प्रिंटींगवर 4012.1कोटी रुपये खर्च झालेत. गेल्या वर्षी खर्चाची हिच रक्कम 4337.8 कोटी एवढी होती. नकली नोटा कोणत्या बँकेत किती आढळल्या त्यावरही आरबीआय रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. त्यात आरबीआयमध्ये 3.9 टक्के तर इतर बँकांमध्ये 96.1 टक्का एवढ्या नकली नोटा सापडल्या. 2020 ते 21 दरम्यान, 2, 08, 625 एवढ्या नकली नोटा पकडल्या तर 2019-20 मध्ये 2,96,695 तर 2018-19 मध्ये त्या 3,17, 384 एवढ्या होत्या.
चलनातल्या नोटा, नाणे जारी करण्याचं काम रिझर्व बँक करते. त्याची व्यवस्था आरबीआयकडून केली जाते. या कामात इशू ऑफिस, करंसी चेस्ट आणि स्मॉल कॉईन डिपॉजिट मोठी भूमिका पार पाडतात. कारण ते देशभर पसरलेले असतात. 31 मार्च 2021 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाकडे करंसी चेस्ट नेटवर्कचा 55 टक्के हिस्सा होता. तुटलेल्या फाटलेल्या नोटांचं कोरोनानं बंद पडलेलं काम आता पुन्हा सुरु केल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. (Reserve bank of india annual report about Coins in circulation)
संबंधित बातम्या :
GST Council Meeting : जीएसटी परिषदेची आज 43 वी बैठक, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा