नवी दिल्ली : अमेरिकन केंद्रीय बँकेने (US Central Bank) व्याज दर वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरबीआय रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ करण्याची शक्यता आहे. फेडने बुधवारी व्याज दरात 25 अंकांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पुढील महिन्यात आरबीआय हेच पाऊल टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा परिणाम चाकरमान्यांवर पडेल. त्यांच्या खिशावर ईएमआयचा बोजा वाढेल. गेल्या दोन वर्षात त्यांच्या ईएमआयमध्ये (EMI) प्रचंड वाढ झाली आहे. आता त्यांना कर्जाचा वाढीव हप्ता भरावा लागणार आहे. तर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याज वाढण्याची शक्यता आहे. महागाई (Inflation) आटोक्यात आणण्याचे आरबीआयचे प्रयत्न अजून ही सुरुच आहेत.
मंदीच्या काळाची आठवण
अमेरिका आणि युरोपात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. व्याज दर आता 4.75 हून 5 टक्क्यांवर पोहचला आहे. 2008 साली मंदी होती. त्यावेळी जो व्याजदर होता, तोच आता आहे. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये फेडने 9 वेळा व्याज दरात वाढ केली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी यापेक्षाही कडक इशार दिला आहे. गरज पडली तर महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दरात वाढ करण्याचा इशारा त्यांनी दिला.
तज्ज्ञानुसार, अमेरिकन केंद्रीय बँकेच्या या निर्णयानंतर भारतीय केंद्रीय बँक, आरबीआय पण व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, आरबीआय 0.25 टक्के रेपो दर वाढवू शकते. याच आठवड्यात युरोपियन केंद्रीय बँकेने (ECB) दरात अर्धा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता भारतीय बँकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आताच आरबीआयने रेपो दरात 25 टक्के वाढ केली. येत्या काही दिवसांत व्याजदरात 25 ते 35 बेसिस पॉईंट वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय केंद्रीय बँकने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 याकाळात रेपो रेटमध्ये 2.50 टक्के वाढ केलेली आहे. त्यामुळे पॉलिसी रेट 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. 8 फेब्रुवारी रोजी आरबीआयच्या पतधोरण समितीने ( MPC) रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ईएमआयचा बोजा पडला आहे. ग्राहक हवालदिल झाले आहेत.
अशी झाली वाढ
आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे.