Home Loan: मुंबईत घर घेताय तर इकडे लक्ष द्या; होम लोनसह घरांच्या किंमतीही महागल्या; आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ

| Updated on: Aug 17, 2022 | 1:22 PM

जिथे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत किमती 9 टक्के आणि 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोलकात्यात 8 टक्के, बंगळुरूमध्ये 4 टक्के आणि मुंबई महानगर प्रदेशात 1 टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत. पुण्यात मालमत्तांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Home Loan: मुंबईत घर घेताय तर इकडे लक्ष द्या; होम लोनसह घरांच्या किंमतीही महागल्या; आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ
Follow us on

मुंबई: रिझर्व्ह बँकेकडून (RBI) रेपो रेटमध्ये (Repo rate)वाढ केल्यानंतर बँकांकडूनही गृहकर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक बँकांचे गृहकर्ज महाग (Home loans are expensive) झाले असल्यान घरांच्या किंमतीही प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे स्वत:चं घर खरेदी करण्याऱ्यांच्या स्वप्नाना तडे जाण्याचे दिवस आले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर आधीच वाढवूण ठेवल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. एकीकडे घरांच्या किमतीही प्रचंड वाढू लागल्याने त्याचा फटका घर आणि गृहकर्ज घेणाऱ्यांना बसत आहे. नुकताच अहवालानुसार देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून दरम्यान निवासी मालमत्तेच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात 1 टक्क्यांनी किमती वाढल्या असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. त्यातच घरांच्या किंमती प्रचंड वाढल्याने सुंदर घरांचे स्वप्न बघणाऱ्यांचे स्वप्त आता खरच भंगले आहे.

गृहकर्ज महागले

गृहकर्ज महाग झाले असल्याने त्याचा फटका अनेकांना बसला आहे, त्यामुळे आता काही कंपन्यांकडून अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहेत. रिअल इस्टेट कंपन्यांची संस्था क्रेडाई, रिअल इस्टेट कन्सल्टंट कॉलियर्स इंडिया आणि लायसेस फोरास यांनी हाऊसिंग प्राइस ट्रॅकर रिपोर्ट 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश, पुणे दिल्ली एनसीआर, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबादसह 8 प्रमुख शहरांचा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या शहरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

रेपो रेटमध्ये वाढ

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट वाढीमुळे घर घेणाऱ्यांना सगळ्यानाच फटका बसला आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील निवासी मालमत्तेच्या किमतीही 10 टक्के वाढल्या असल्याचे सांगत या किंमती सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरामधूनही किमती वाढल्या आहेत.

मुंबईकरांना फटका

जिथे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत किमती 9 टक्के आणि 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोलकात्यात 8 टक्के, बंगळुरूमध्ये 4 टक्के आणि मुंबई महानगर प्रदेशात 1 टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत. पुण्यात मालमत्तांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बँकांच्या गृहकर्ज महाग झाल्याने देशातील आठ शहरांसह महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईत घर घेणाऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे.