शेतकरी होणार तेलंगणाचा मुख्यमंत्री, रेवंत रेड्डी यांची संपत्ती पाहुन व्हाल हैराण

| Updated on: Dec 06, 2023 | 9:20 AM

Telangana CM Revanth Reddy | रेवंत रेड्डी यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. या चार वर्षात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर उतरला. त्यांनी अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही. रेड्डी हे तेलंगणाचे श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

शेतकरी होणार तेलंगणाचा मुख्यमंत्री, रेवंत रेड्डी यांची संपत्ती पाहुन व्हाल हैराण
Follow us on

नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : तेलंगणात उद्या 7 डिसेंबर रोजी एक शेतकरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. रेवंत रेड्डी हे काँग्रेस सरकारचा नवीन चेहरा असतील. ते एक शेतकरी आहे. पण त्यांची संपत्ती पाहुन तुम्ही हैराण व्हाल. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या व्यवसायाच्या रकान्यात शेतकरी असल्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे एक राजकारणी असतानाच ते शेतकरी पण आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणूकीत भारत राष्ट्र समितीला दहा वर्षानंतर रोखण्यात काँग्रेसला मोठे यश आले. काँग्रेसला बहुमत मिळाले. त्यामागे काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचा हात असल्याचे बोलले जाते.

रेवंत रेड्डी यांच्याकडे किती संपत्ती?

निवडणूक प्रतिज्ञापत्रात रेवंत रेड्डी यांनी त्यांच्याकडील कोट्यवधी संपत्तीची माहिती दिली. प्रतिज्ञापत्रानुसार, सध्या रेवंत रेड्डी हे एकूण 30.04 कोटींच्या संपत्तीचे मालक आहे. त्यांच्याकडे 5.17 कोटी रुपयांपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे. तर 24,87,87,500 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. या संपत्तीत त्यांच्यासह पत्नीचा वाटा आहे. पत्नीकडे 15,02,67,225 रुपयांची तर रेवंत रेड्डी यांच्याकडे 8,62,33,567 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 2,18,93,343 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावार 2,92,68,008 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

हे सुद्धा वाचा

चार वर्षांत संपत्तीत वाढ

चार वर्षांपूर्वी रेवंत रेड्डी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकूण 24,53,57,182 रुपयांची नोंद केली होती. 2023 मध्ये आता विधानसभा निवडणूकीत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात ही संपत्ती 30,04,98,852 रुपये असल्याचे समोर आले. म्हणजे संपत्तीत 5,51,41,670 रुपयांची वाढ झाली. 2019 मध्ये त्यांच्यावर 2,93,93,841 रुपयांचे कर्ज होते. 2023 मध्ये ते 1,90,26,339 रुपयांवर आले. चार वर्षांत कर्ज 1,03,67,502 रुपयांनी कमी झाले.

7.77 कोटी रुपयांची जमीन

रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 7.77 कोटी रुपयांची शेती आहे. त्यांच्याकडे 4.82 कोटी अकृषक जमीन आहे. पती आणि पत्नीकडे दोन बंगले आहेत. त्यांची किंमत 12.28 कोटी रुपयांहून अधिक आहे. या पती-पत्नीकडे व्यावसायिक जमीन नाही. त्यांच्या पत्नीच्या नावे रिअल इस्टेटमध्ये 2,16,770 रुपयांची गुंतवणूक आहे. तर एलआयसीमध्ये 5 लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 1235 ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत 83,36,000 रुपये आहे. तर 7,17,800 रुपयांची चांदी आहे.