नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : सोने-चांदीचा (Gold Silver Price Today) सध्या स्विंग मूड आहे. त्यात पडझड आणि तेजीच्या सत्रामुळे भावात चढउतार सुरु आहे. सराफा बाजारात खरेदीदारांना धक्का सहन करावा लागत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या किंमतीत ही तफावत दिसत आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम दिसत आहे. 20 जुलैपर्यंत दोन्ही धातूमध्ये तेजीचे सत्र होते. 21 जुलैपासून भावात घसरण झाली. सोन्यात आतापर्यंत 1500 रुपयांची तर चांदीत 4,000 रुपयांची घसरण झाली. 27 जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. तर चांदीने एक हजाराने झेप घेतली. 28 जुलै रोजी सोन्यात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली. तर चांदीत 2000 रुपयांची पडझड झाली. 29 जुलै रोजी सोने 250 रुपयांची तर चांदीत 600 रुपयांची वाढ झाली.
दरवाढीचा आलेख
सरत्या आठवड्यात सोने-चांदीत तीनवेळा किंमती वधारल्या तर दोनदा किंमतीत घसरण झाली. 26 जुलै रोजी किंमती 150 रुपयांनी वधारल्या. 27 जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. तर चांदीने एक हजाराने झेप घेतली. 29 जुलै रोजी सोने 250 रुपयांची तर चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 55,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60530 रुपये प्रति 10 ग्रॅम गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,491 रुपये, 23 कॅरेट 59,253 रुपये, 22 कॅरेट सोने 54,494 रुपये, 18 कॅरेट 44,618 रुपये, 14 कॅरेट सोने 34,802 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,420 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
अशी झाली घसरण
21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली. 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 25 जुलै रोजी 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. 28 जुलै रोजी जवळपास 400 रुपयांनी दर घसरले.
चांदीत पडझड
गुडरिटर्न्सनुसार, चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. 28 जुलै रोजी 2000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 29 जुलै रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.