नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : जगात सध्या रशिया-युक्रेन आणि आता इस्त्राईल-हमास (Israel-Hamas War) अशी दोन युद्ध सुरु आहेत. त्याचे पडसाद जगभर दिसत आहे. अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. तर शेअर बाजारात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. अशी परिस्थितीत काही कंपन्यांचे शेअर जोरदार वधारले आहेत. अशाच एका कंपनीने बाजारात कमाल दाखवली आहे. ही कंपनी चंद्रयान 3 या महत्वकांक्षी मोहिमेशी निगडीत आहे. आकड्यांवर नजर टाकली तर एकाच महिन्यात या कंपनीचा शेअर 40 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर (Multibagger Share) वधारल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. तर अनेक जण हा स्टॉक खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत.
पाच दिवसांत कमाल
गेल्या पाच दिवसांच्या व्यापारी सत्राचा हिशोब मांडला तर कंपनीचा शेअर 16 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. आज तर या शेअरने कमालच केली आहे. एकाच मिनिटात या शेअरने 8 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कंपनीला 200 कोटींपेक्षा अधिकचा फायदा झाला आहे. या शेअरची गगन भरारी सर्वांनाच थक्क करणारी आहे.
अशी आहे कामगिरी
अवंटेल कंपनी लिमिटेड ही आयटी सोल्यूशन्स आणि स्पेस टेक कंपनी आहे. ती चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 मध्ये सहभागी आहे. दुपारी 1:40 वाजता या कंपनीचा शेअर 15 रुपयांनी उसळला. तो तेजीसह 332 रुपयांच्या जवळपास आहे. तर त्याने 343.30 रुपयांचा विक्रमी उच्चांक नोंदवला आहे. एक दिवसापूर्वी हा शेअर 317 रुपयांवर बंद झाला होता.
एका मिनिटात 200 कोटींहून अधिकची कमाई
या तेजीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. कंपनीचे बाजार भांडवल एक दिवसापूर्वी ले 2580 कोटी रुपये होते. तर आज बाजार सुरु होताच कंपनीचे भांडवल 2794 कोटी रुपयांवर पोहचले. मार्केट कॅप एका मिनिटात 214 कोटी रुपयांचा फायदा झाला.
गेल्या 22 वर्षात दिला रिटर्न
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.