काय नाय वो… फक्स्त 250 रुपयात व्हाल करोडपती; म्यूच्युअल फंडाचा नवीन नियम कळला का?

| Updated on: Sep 02, 2024 | 9:49 PM

म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूकीत आता महिना 250 रुपये गुंतवणूकीचा पर्याय सर्वसामान्यांसाठी लवकर येणारा असल्याचे सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी यांनी म्हटले आहे.

काय नाय वो... फक्स्त 250 रुपयात व्हाल करोडपती; म्यूच्युअल फंडाचा नवीन नियम कळला का?
madhavi puri buch sebi
Follow us on

म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूकदारांची संख्या वाढविण्यासाठी शेअर मार्केट नियामक मंडळ सेबी मोठा निर्णय घेतला आहे. लोक म्युच्युअल फंडात महिना केवळ 250 रुपयांची SIP सुरु शकतील असे सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी जाहीर केले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक सोपी करण्यासाठी आणि या योजनेत सर्वसामान्यांची गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच व्यापक लोकसंख्येपर्यंत ही योजना पोहचावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.

म्यूच्युअल फंड (Mutual Fund) उद्योगासोबत मिळून या योजनेवर काम केले जाणार असल्याचे सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी CII च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. या योजनेत गुंतवणूक मासिक 250 रुपये SIP चा लाभ उठवू शकणार आहेत. या उद्योगात ही सुधारणा करण्यासाठी असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडिया (AMFI) आणि या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता 250 रुपये महीना SIP ची सुविधा

जेव्हा लोकांसमोर मासिक 250 रुपये गुंतवणूकीचा पर्याय खुला होईल तेव्हा ते म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसाठी मोठ्या संख्येत सहभागी होतील. आणि भविष्यात मोठा फंड बनवू शकतील. सुमारे तीन डॉलर प्रति महिन्याचा हा फॉर्म्युला जगातील लोकांना आश्चर्यचकीत करणार असून भारतासाठी हा विकसित भारताचा रस्ता साफ होणार असल्याचे म्हटले जात आहे.

घर-घर SIP?

म्यूच्युअल फंड (Mutual Fund) उद्योग या संभावित बदलासाठी तयार आहे, नियामक आणि उद्योग हितसंबंधाच्या दरम्यान, सह संबंध आणि सहकार्याच्या महत्वावर जोर देत माधबी पुरी बुच यांनी सांगितले.आश्चर्य म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 500 रुपया महिन्याची SIP उपलब्ध आहे. याच कार्यक्रमात बुच यांनी रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट (रीट) वर काहीही टिपण्णी करण्यास नकार दिला आणि सांगितले की अशा युनिट्सच्या सरलीकरणासाठी नियम अस्तित्वात असल्याचे सांगितले. जर आपण रिटवर एक शब्दही बोलले तर माझ्यावर हितसंबंधांचा आरोप होईल. अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या एका अहवालात सेबी अध्यक्ष आणि खाजगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनशी संबंधाचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर सेबी अध्यक्षांनी आपले मत उघड केले आहे.