नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी (Safest Bank in India) जाहीर केली. या बँकांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय (HDFC, ICICI, SBI) यांचा समावेश आहे. या बँकांना D-SIB असे ही म्हणतात. D-SIB चा अर्थ डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपोर्टेंट बँक असा आहे. दरवर्षी केंद्रीय रिझर्व्ह बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते. या बँका बुडीत खात्यात गेल्या. त्यांनी दिवाळखोरी घोषीत केली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते. त्यामुळे केंद्र सरकारसह आरबीआय या बँका बुडू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करतात.
परंतु या बँकांची निवड होते तरी कशी, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. या बँका देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी किती महत्वाच्या आहेत, हे कशावरुन ठरते. अशी यादी तयार करण्याची गरज केंद्र सरकारला, आरबीआयला कधी वाटली. याविषयीचे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. D-SIB साठी केंद्र सरकारने असे प्रयत्न केले आहे.
2008 साली जागतिक मंदी आली. अर्थात भारताला या मंदीची फार झळ बसली नाही. पण जगातील अनेक मोठ्या बँका या मंदीत धराशायी झाल्या. त्यावेळी केंद्र सरकार आणि आरबीआयने अशा काही बँकांची निवड करण्याची गरज वाटली. या बँका मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला ताबडतोब मदत करतील, यासाठी त्यांना सर्व सुविधा देण्याची योजना आखण्यात आली.
या बँकांसाठी केंद्र सरकार आणि आरबीआय विशेष योजना राबविते. या बँकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तर केंद्र सरकार त्यांना वाचविण्यासाठी विशेष भर देते. त्यातून डीएसबीआयची सुरुवात झाली. त्यासाठी निकष ठरविण्यात आले.
2014 साली आरबीआयने यासाठीची फ्रेमवर्क तयार केली. 2015 मध्ये डीएसआयबीने पहिली यादी तयार केली. या पहिल्या यादीत SBI आणि ICICI ने स्थान पटकावले. त्यानंतर या यादीत आणखी एका बँकेची भर पडली. एचडीएफसी बँकेने या यादीत प्रवेश केला.
देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2 टक्क्यांहून ज्या बँकांची एकूण संपत्ती असते, त्यांचा समावेश डीएसआयबी बँकांच्या यादीत करण्यात येतो. काही खास मुद्यांच्या आधारे या बँकांना पाच विविध श्रेणीत समाविष्ट करण्यात येते. चढत्या क्रमाने ही यादी तयार करण्यात येते.
या यादीत पाचव्या क्रमांकावर देशातील एक ही बँक नाही. पहिल्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक आहे. त्यानंतर एसबीआयचा क्रमांक लागतो. या बँकांना काही नियमही लागू असतात. या नियमांचे त्यांना पालन करावे लागले.