भारतीय लोक सौदी अरबमध्ये नोकरीसाठी जात असतात. साऊथकडील केरळसारख्या राज्यातील अनेक तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला प्राधान्य देत असतात. परंतू आता सौदीला नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांवर मोठा परिणाम होईल असा निर्णय सौदीच्या राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला आहे. त्यामुळे भारतीयांचे धाबे दणाणले आहे. आता भारतीयांना सौदीत सहजासहजी नोकरी मिळणे कठीण होणार आहे. काय घेतला निर्णय पाहा…..
सौदी अरबच्या राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी एक निर्णय घेतला आहे. खाजगी क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या नोकरीमध्ये स्थानिक नागरिकांना आरक्षण देण्याची घोषणा सौदी अरबच्या राजपूत्राने केली आहे. त्यांनी आपल्या नागरिकांसाठी नोकरीत आता 25 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. रविवारी ही घोषणा करण्यात आली असून स्थानिक भूमिपूत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मनुष्यबळ संशोधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या या योजनेच्या नूसार इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात सौदीच्या नागरिकांची संख्या वाढणार आहे. आणि त्यांना रोजगार मिळणार आहे. सौदी अरबची सरकारी प्रेस एजन्सी सौदी प्रेस एजन्सीने सांगितले की नगरपालिका, ग्रामीण आणि निवास मंत्रालयच्या साथीने मंत्रालयाने इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात 25 टक्के स्थानिकासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हा धोरणामुळे सौदीतील तरुण आणि तरुणींना नोकरीची संधी मिळेल. ज्या खाजगी कंपनीत पाच किंवा पाच हून जास्त कर्मचारी काम करीत असतील त्या प्रत्येक कंपनीला या आरक्षणाची अमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या कंपन्या या नियमांची अमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
सौदीचे क्राऊन प्रिन्स यांनी आपला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट व्हीजन 2023 अंतर्गत सौदीच्या प्रत्येत क्षेत्रातील नियम बदलत आहेत. सौदी अरबच्या विविध क्षेत्रात स्थानिक भूमिपूत्रांना संधी देण्यासाठीचे धोरण ठरविण्यात आले आहे. साल 2030 पर्यंत सौदीतील बेरोजगारीचा दर 7 टक्क्यांपर्यंत आणण्याचे प्रिन्स यांनी ठरविले आहे. अशा प्रकारे उत्पन्नाचे स्रोतात विविधता आणून कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याची सौदी सरकारची इच्छा आहे. सौदीतील खाजगी इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये आरक्षणाची घोषणा केल्याने तेथे नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांच्या आशेवर पाणी फेरणार आहे.
दरवर्षी भारतातील अनेक बेरोजगार नोकरीसाठी सौदीला जात असतात. स्कील्ड आणि सेमी स्कील्ड कामगारांचा यात समावेश आहे. यात इंजिनिअर्सचा सर्वाधिक समावेश असतो. साल 2022 मध्ये नोकरीसाठी सौदीत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 5 टक्के वाढ झाली होती. साल 2022 मध्ये एकूण 1,78,630 भारतीय नोकरीसाठी सौदीला गेले होते. आता स्थानिकांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने भारतीयांसाठी ही वाईट बातमी आहे. कारण भारतात बेकारीचे प्रमाण कोरोना काळानंतर प्रचंड वाढले आहे.