मुंबई : जर तुमचे आई-वडील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर तुम्हाला आरोग्य विमातंर्गत 30 हजार रुपयांच्या प्रीमियमवर टॅक्स सूट मिळू शकते. तसेच तुम्ही स्वत: आणि तुमचे आई-वडील असे दोघेही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला आरोग्य विमातंर्गत 55 हजारांच्या प्रीमियमवर टॅक्स सूट मिळू शकते. (Save Income Tax on Health Checkup Expenses)
आयकर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या घरातील 60 ते 80 वय असलेल्या व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च हा 60 हजाराच्या आसपास असेल, तर तुम्हाला त्यावर टॅक्सवर सूट मिळू शकते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींचे वय हे 80 हून अधिक आहे, त्यांना यात 80 हजारांपर्यंत मिळू शकते. जर तुम्ही 40 टक्के दिव्यांग आहात, तर तुम्हाला यातंर्गत टॅक्स सूट मिळू शकते.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला विमा कंपन्यांकडून टॅक्स जारी केला जातो. ज्यात तुम्ही Preventive Health Checkup याद्वारे कायदा 80D अंतर्गत दावा करता येतो. मात्र या खर्चाची सर्व कागदपत्रे तुम्हाला टॅक्स फाईल करताना द्यावी लागतात. यात डॉक्टरांचे Prescription, मेडिकल चाचणीची पावतीचा समावेश आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला जपून ठेवाव्या लागतील.
दरम्यान कायद्यानुसार प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी झालेला खर्च हा तुम्हाला वजा करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ठराविक वैद्यकीय आरोग्य विम्याची गरज भासत नाही.
काही महत्त्वपूर्ण सूचना
1.) प्राप्ती कायद्याच्या कलम 80 D अंतर्गत वैद्यकीय खर्चावर कर सवलत
2.) ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांना 25 हजारांची कर सवलत
3.) ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारांची कर सवलत
4.) जर तुमच्याकडे कोणताही वैद्यकीय विमा नसेल, तरीही खर्चाचा दावा देखील केला जाऊ शकतो.
5.) प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी 50 हजारापर्यंत खर्चाचा दावा करता येतो.
6.) ज्येष्ठ नागरिक किंवा बिगर ज्येष्ठ नागरिकांना HUF वरही सूट मिळते.
7.) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5 हजार रुपयांची सूट मिळण्याची शक्यता
8.) रोख रक्कम भरल्यावरही करात सूट दिली जाईल.
9.) आरोग्य तपासणी दरम्यान कागदपत्र राखून ठेवा
कलम 80 D व्यतिरिक्त इन्कम टॅक्स कायद्यात आणखी दोन कलम आहेत ज्याद्वारे तुम्हाला आजारापणातील खर्चांवर लाभ मिळू शकतो. कलम 80 DD म्हणजे आपल्यावर अवलंबून असणार्या अपंग व्यक्तीचा वैद्यकीय खर्च. यात तुमचा जोडीदार मुले, पालक, भाऊ किंवा बहीण असू शकतात.
करावर सूट मिळण्यासाठी तुम्ही किती टक्के दिव्यांग आहेत, हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही 40 टक्के अपंग असाल, तर कर बचतीसाठी 75,000 रुपयांपर्यंतचे वैद्यकीय खर्च कव्हर केले जाऊ शकतात. जर आश्रित 80 टक्के अपंग असाल तर कर बचतीसाठी 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंतचा मेडिकल खर्च कव्हर करता येतो. (Save Income Tax on Health Checkup Expenses)
संबंधित बातम्या :
Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा
आयकर भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्या; उद्योजकांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी