नवी दिल्ली : तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल अर्थात खूप पैसे कमवायचे असतील तर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगाराचा मोठा प्रश्न बनला असताना देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय 44 कोटीहून अधिक ग्राहकांना पैसे कमविण्याची संधी देत आहे. वास्तविक, बँक आपल्या योनो अॅपवर डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्याची सुविधा ग्राहकांना देत आहे. एसबीआयकडे हे खाते उघडल्यास आपण 1350 रुपये वाचवू शकता. या खात्यातून आपण पैसे कसे कमवू शकता हे जाणून घ्या. (SBI brings golden opportunity to earn money, open a demat account and save Rs. 1350)
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते बँक खात्यासारखेच आहे. यात फरक फक्त इतका आहे की बँक खात्यात पैशांचा व्यवहार केले जातो, तर डिमॅट खात्यात समभागांची खरेदी-विक्री केली जाते. ज्याप्रमाणे बँकांमध्ये पैसे सुरक्षित असतात. त्याचप्रमाणे डिमॅट खात्यातील समभाग सुरक्षित असतात. त्यामुळे याबाबत चिंतेचे कुठलेच कारण नाही.
स्टेट बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर या नव्या योजनेबद्दल ट्विट केले आहे. एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की योनो अॅपच्या माध्यमातून डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडा आणि 1,350 रुपये बचत करा. बँकेच्या मते, 850 रुपयांचे खाते विनामूल्य उघडता येईल आणि पहिल्या वर्षासाठी 500 रुपये डीपी एएमसी विनामूल्य मिळवता येईल. डीमॅट खात्यामध्ये शेअर म्हणजेच समभागांव्यतिरिक्त म्युच्युअल फंड युनिट्स, डिबेंचर, बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीजदेखील ठेवता येतात. एसबीआयच्या मते, सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूकीपूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
– प्रथम तुमच्या मोबाईल फोनवर एसबीआयचा योनो (योनो) अॅप डाऊनलोड करा
– त्यानंतर योनो अॅपवर लॉग इन करा
– मग गुंतवणुकीच्या पर्यायावर जा
– येथे ओपन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटच्या पर्यायावर क्लिक करा
– प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा (SBI brings golden opportunity to earn money, open a demat account and save Rs. 1350)
आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!https://t.co/dAqHPLPT41#anandshinde | #marathiplaybacksinger | #marathisinger | #milindshinde | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2021
इतर बातम्या
मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी 7 आणि 21 मार्चला बंद; ‘या’ मार्गाने करा प्रवास