SBI चा 44 कोटी ग्राहकांना सावधानतेचा इशारा, अन्यथा होईल मोठी फसवणूक

| Updated on: May 30, 2021 | 1:50 PM

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (SBI warns account holders)

SBI चा 44 कोटी ग्राहकांना सावधानतेचा इशारा, अन्यथा होईल मोठी फसवणूक
SBI
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. SBI च्या कोणत्याही ग्राहकांनी आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन शेअर करु नका, असा सल्ला दिला आहे. तसेच अज्ञात लिंकवरुन कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नका. त्याशिवाय तुमची एसबीआय, आरबीआय, सरकारी कार्यालय, पोलीस, केवायसी अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्यांपासून सावध राहा, असे ट्वीट SBI ने केले आहे. (SBI warns account holders not to share any sensitive details)

एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की फसणवूक करणाऱ्यांपासून सतर्क राहा. कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती ऑनलाईन शेअर करु नका. तसेच कोणत्याही अज्ञात संकेतस्थळावरुन अॅप डाऊनलोड करु नका, अशी सूचना दिली आहे.

कधीही करु नका हे काम

?कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग आयडी / पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, ओटीपी आणि इतर वैयक्तिक माहिती शेअर करु नका.

?एसबीआय, आरबीआय, शासकीय कार्यालय, पोलीस, केवायसी प्राधिकरण अशा विविध नावाने फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा.

?SBI ग्राहकांनी दूरध्वनी कॉल / ई मेल यासारख्या ठिकाणी येणाऱ्या काही अज्ञात लिंकवरु कोणतेही मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करू नये

?तसेच ईमेल, एसएमएस आणि अन्य सोशल मीडियाद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही आकर्षक ऑफरवर क्लिक करु नका.

?एसबीआय किंवा त्याचे कोणतेही प्रतिनिधी तुम्हाला कधीही ईमेल, एसएमएस पाठवत नाही. तसेच ते तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा वन टाईम पासवर्डसाठी फोन करत नाही.

कुठे तक्रार कराल?

दरम्यान जर तुम्हाला अशाप्रकारे कोणताही ई-मेल/ एसएमएस, फोन कॉल आला तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. अनेकदा इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. जर तुम्हाला अशाप्रकराची काही फसवा मेल आला तर .phishing@sbi.co.in यावर तात्काळ कळवा. तसेच एसबीआयच्या सर्व ग्राहकांना याची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. (SBI warns account holders not to share any sensitive details)

संबंधित बातम्या : 

निम्न वेतनधारकांना दिलासा, कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन

हायवेवर वाहन चालवण्यापूर्वी नवीन नियम जाणून घ्या, पैसे वाचणार आणि विनामूल्य प्रवास होणार

कोरोना काळात SBI चा मोठा निर्णय, आता ग्राहकाला नॉन-होम शाखेतून 1 लाख काढता येणार