सेबीचा एका फार्मा कंपनीला दणका, तब्बल 14 लाखांचा दंड ठोठावला

| Updated on: May 20, 2021 | 10:31 AM

सेबीने एका फार्मा कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. SEBI pharma company Biocon

सेबीचा एका फार्मा कंपनीला दणका, तब्बल 14 लाखांचा दंड ठोठावला
सेबी
Follow us on

नवी दिल्ली: सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने एका फार्मा कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. सेबीने फार्मा कंपनी बायोकॉन लिमिटेड आणि त्यांच्याद्वारे प्राधिकृत करण्यात आलेले प्रतिनिधी यांच्यावर बाजार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 लाखांचा दंड ठोठावला आहे. सेबीने बायोकॉन कंपनी द्वारा प्राधिकृत केलेले व्यक्ती नरेंद्र चिरमुले यांना देखील पाच लाखाचा दंड ठोठावला आहे. नरेंद्र चिरमुले कंपनीमध्ये संशोधन आणि विकास विभागात वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. व्यवहार बंद असताना देखील कंपनीच्या शेअर्सची विक्री केल्याबद्दल चिरमुले यांच्यावर दंड ठाोठावण्यात आला.(SEBI imposed fourteen lakh rupees fine on pharma company Biocon )

सेबीनं कारवाई का केली?

प्रोहिबिशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन नरेंद्र चिरमुले यांनी केल्याचं स्पष्ट झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. सेबीने केलेल्या चौकशीमध्ये असे दिसून आले की 31 डिसेंबर 2018 ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या आर्थिक बाबींची घोषणा करताना अधिकाऱ्यांनी 1 ते 26 जानेवारी 2019 पर्यंत व्यवहार बंद ठेवले होते. बायोकॉन कंपनीने त्यांच्या तिमाहीच्या व्यवसाय बद्दलची घोषणा 24 जानेवारी 2019 ला केली होती.

सेबीला 262 दिनानंतर माहिती दिली

शेअरबाजारातील नियमानुसार कोणत्याही कंपनीमध्ये जर दहा लाख रुपयांपेक्षा अधिकच्या शेअर्सचे व्यवहार झाले तर त्याची माहिती शेअर बाजाराला आणि नियामक संस्थेला द्यायची असते. ही जबाबदारी कंपनीचे प्रवर्तक, संचालक, नामांकित करण्यात आलेली व्यक्ती यांच्यावर असते. बायोकॉन कंपनीने माहिती 262 दिवसानंतर सेबीला दिली. या शिवाय बाजार नियमांचे उल्लंघन माहिती देखील तातडीने देणे आवश्यक असतं. मात्र, बायोकॉन कंपनीनं ही माहिती सेबीला 28 दिवसानंतर दिली.

बायोकॉनचा नफा शंभर टक्के वाढला

31 मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये बायोकॉन कंपनीचा नफा शंभर टक्के वाढल्याचं समोर आलं आहे. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीला निव्वळ नफा 105 टक्के वाढून 254 कोटी एवढा झाला. तर कंपनीचा महसूल 26 टक्के वाढून 2044 कोटी रुपये झाला. संपूर्ण आर्थिक वर्षाची टक्केवारी काढल्यास कंपनीच्या आर्थिक व्यवहारामध्ये 14 टक्के वाढ पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या:

LIC च्या ‘या’ पॉलिसीत दरमहा 1302 रुपये जमा करून मिळवा 63 लाख, जाणून घ्या…

आता Ration Card शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा, जाणून घ्या…

(SEBI imposed fourteen lakh rupees fine on pharma company Biocon )