नवी दिल्ली : मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराने (Share market updates) पुन्हा उसळी घेतली आहे. आज (मंगळवारी) सेन्सेक्स मध्ये 1700 अंकांहून अधिक तेजी दिसून आली. सेन्सेक्सने 58 हजारांचा टप्पा पुन्हा पार केला. सेन्सेक्स 1733 अंकांच्या तेजीसह 58142.05 आणि निफ्टी 338 अंकांच्या तेजीसह 17352 वर पोहोचला. बजाज फायनान्स, एल अँड टी, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्र बँक आजचे सर्वाधिक वधारणीचे शेअर्स ठरले. बजाज फायनान्सचा (Bajaj Finance) मार्केट कॅपने HDFC घौडदोडीला मागं टाकलं. रशि-यूक्रेन (Russia-Ukraine crisis) वादाचे मोठे पडसाद भारतीय शेअर बाजारावर दिसून आले होते. काल (सोमवारी) शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण नोंदविली गेली. गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडावे लागले होते.
• टाटा मोटर्स (6.90)
• आयसर मोटर्स (5.96)
• श्री सिमेंट (5.60)
• बजाज फायनान्स (5.25)
• हिरो मोटोकॉर्प (4.91)
• सिप्ला (-3.46)
• ग्लँड फार्मा (-2.74)
• एनएमडीसी (-2.26)
• ओएनजीसी (-1.23)
• मुथूट फायनान्स (-0.09)
काल (सोमवारी) रशिया-युक्रेनच्या वाढता वाद, इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमती, शेअर्स विक्रीचे वाढते सत्र यांचा सर्वाधिक परिणामामुळे शेअर्स बाजारात विक्रमी घसरण झाली. तब्बल 1750 अंकांनी निर्देशांक गडगडला आणि निफ्टीत 17 हजारांच्या खाली घसरण झाली होती.
युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. मात्र, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली आहेत. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात 2.55 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि 94.21 डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत.
झोमॅटो शेअर आज 82.70 रुपयाच्या स्तरावर बंद झाला. व्यवहाराच्या दरम्यान 75.75 वर पोहोचला होता. झोमॅटो शेअर्सची इश्यू प्राईस 76 रुपये आहे. त्यामुळे इश्यू प्राईसच्या पेक्षा कमी झोमॅटोची ट्रेडिंग सुरू होती.
इतर बातम्या :