मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील शेअर बाजारातील तेजी, आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यामुळे झालेल्या सकारात्मक परिणामामुळे भारतीय शेअर बाजार (Share market) ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) सेन्सेक्सने (Sensex) 50 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला. आज बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्सने 50,126.76 चा टप्पा गाठला भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. सेन्सेक्सनं उसळी घेण्यामागे विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक हे मुख्य कारण असल्याचं आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. आर्थिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार सेन्सेक्सनं 1000 हजाराचा टप्पा 1990 मध्ये पार केला होता. (Sensex holds 50k up 126 points for first time what experts said about investment)
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी TV9 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारातील तेजी हे भारतीय सेन्सेक्समध्ये तेजी असण्याचं कारण आहे. कोरोना संसर्गाच्या काळात केंद्र सरकारनं देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसत आहे. जागतिक रेटिगंक संस्थांनी केंद्र सरकारनं उचलेल्या पावलांचं कौतुक केल आहे. या सर्व कारणांमुळे भारतीय शेअर बाजारावरील परकीय गुंतवणूक दारांचा विश्वास वाढल्याचं आसिफ इकबाल यांनी सांगितलं.
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप, निर्देशांक पहिल्यांदा 50 हजारांवरhttps://t.co/Opp7vZhqOZ#bse | #nse | #Sharemarket | #mumbai | #JoeBiden
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
वीएम पोर्टफोलिओचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांनी परकीय गुंतवणूकदारांनी भारतात 1 जानेवरी ते 20 जानेवारी दरम्यान 20,098 कोटी रुपयांची गुतंवणूक केल्याचं सांगितले. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेअर बाजारात विक्रमी गुंतवणूक झाल्याचं मित्तल यांनी सांगतिले. डिसेंबरमध्ये 48 हजार 223.94 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झालीय. तर, नोव्हेंबरमध्ये 65 हजार 317.13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
भारत सरकारनं कोरोना लसीकरणाला सुरुवात केली आहे. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात केंद्र सरकार मोठ्या आर्थिक सुधारणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं आर्थिक सुधारणा केल्यास कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यात आहे. परिणामी लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
वर्ष | महिना | पॉईंटस |
---|---|---|
1990 | जुलै | 1000 |
199 | ऑक्टोबर | 5000 |
2006 | फेब्रुवारी | 10000 |
2007 | जुलै | 15000 |
2007 | डिसेंबर | 20000 |
2014 | मे | 25000 |
2015 | मार्च | 30000 |
2018 | जानेवारी | 35000 |
2020 | फेब्रुवारी | 40000 |
2020 | डिसेंबर | 45000 |
2021 | जानेवारी | 50000 |
गुंतवणूकदारांनी काय करावं
भारतासह जगातील शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळेल. शेअर बाजारांचे इंडेक्स वधारणार नसले तरी मिड कॅप आणि स्मॉलकॅफ शेअर्समध्ये तेजी असेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवत आहेत.येत्या काळात एलं अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक वाढू शकते. पुढील एक वर्षात निफ्टी 15 हजार ते 16 हजारादरम्यान राहील, असा अदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
Todays Gold Rate : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम, सेन्सेक्सलाही उसळी