नवी दिल्ली : शेअर मार्केटवर (Share Market Updates) विक्रीचा दबाव असल्याचे पहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार (Stock market) घसरणीसह चालू झाला. शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) 440 अकांनी घसरून 56757 अंकांवर पोहोचला. त्यानंतर लगेचच पाच मिनिटांच्या अंतरानी पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली, सेन्सेक्स तब्बल 700 अकांनी कोसळला. सध्या सेन्सेक्स 56467 अंकांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टीत देखील घसरण झाली असून, निफ्टी 235 अंकांच्या घसरणीसह 16936 अंकांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात देखील सेन्सेक्समध्ये 1141 अंकाची घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये तब्बल 2 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर चालू आठवड्यात तरी शेअर बाजारात तेजी दिसून येईल असा गुंतवणूकदारांचा अंदाज होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आज पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या पडझडीसह बंद झाला होता. मात्र आज ओपन होताच सेन्सेक्समध्ये पुन्हा एकदा घट झाली. आज सेन्सेक्स जवळपास सातशे अकांनी कोसळला आहे. गेल्या मार्च महिन्यात शेअर बाजाराला सर्वाधिक फटका बसला आहे. शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढत असून, त्यामुळे सेन्सेक्समध्ये घसरण होत आहे. ही घसरण केव्हा थांबणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका बसला आहे. अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली.
आज आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, पीव्हीआर यासारख्या कंपन्यांच्या शेअरवर लक्ष असून द्या, अनेक ब्रोकरेज फर्म्सनी आज आयसीआयसीआय तसेच एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये तेजी दिसू शकते असा गुंतवणूक तज्ज्ञांचा अंदाज आहे. या शिवाय बँकिंग क्षेत्रातील काही शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
टीप : गुंतवणूकदारांनी गुंतवणूक तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी, टीव्ही 9 मराठी गुंतवणूक करण्यासंबंधी कोणताही सल्ला देत नाही.
जीएसटीची पुन्हा लगीनघाई; नवीन वऱ्हाडींची सरबराई, 28 टक्के जीएसटीतंर्गत 143 वस्तुंचा समावेश होणार
Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव