नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) गेल्या आठवड्यात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजाराने या वर्षांत अनेकदा नवनवीन रेकॉर्ड केले आहे. शेअर बाजारा आता नवीन इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. पण या पडझडीमुळे या गतीला, या तेजीला अडथळा आला आहे. त्याचा फटका देशातील मोठ्या उद्योग समूहाला बसला आहे. तसेच अनेक मोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका एचडीएफसीला बसला आहे. या पडझडीतही नवीन रेकॉर्ड करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) आता सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे.
इतका बसला फटका
देशातील टॉप-10 कंपन्यांचे बाजारातील भांडवल गेल्या आठवड्यात 74,603.06 कोटी रुपये घटले. या कंपन्याच्या शेअरचे मूल्य घटले आहे. म्हणजे या कंपन्यांच्या शेअर होल्डर्सची व्हॅल्यू पण कमी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पण त्याचा फटका बसला. त्यांचे गुंतवणूकीचे मूल्य घटले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि भारतीय स्टेट बँकेला फायदा झाला आहे.
एचडीएफसी बँकेचे सर्वात जास्त नुकसान
देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश होतो. या आठवड्यात बँकेला त्यांच्या बाजार मुल्यात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. एचडीएफसी बँकेचे भांडवल 25,011 कोटी रुपयांनी घटले. आता मार्केट कॅपिटलायझेशन 12,22,392.26 इतके उरले आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि आयटीसीचे मार्केट व्हॅल्यू घसरले आहे.
या कंपन्यांचे शेअर घसरले
रिलायन्सचा एकहाती झेंडा
बाजारात घसरणीचे सत्र असताना रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजारात एकहाती किल्ला लढवला. बाजारात चढता आलेख कायम ठेवला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवलात 25,607.85 कोटी रुपयांची वृद्धी दिसून आली. आता हे भांडवल 17,23,878.59 कोटी रुपये झाले. तर टीसीएस आणि एसबीआय या कंपन्याचे मार्केट कॅप पण वधारले.
सर्वात मौल्यवान कंपनी
या पडझडीतही नवीन रेकॉर्ड करणारी रिलायन्स इंडस्ट्रीत आता सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. यानंतर टॉप-10 मध्ये क्रमश: टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, एसबीआई, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे.